शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

सावंतवाडीतील मिनी पोलिस चौकी हटवली, नगरपरिषदेची परवानगी नसल्याने कारवाई

By अनंत खं.जाधव | Published: March 18, 2023 12:43 PM

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते या मिनी पोलीस चौकीचे सकाळीच उद्घाटन झाले होते

सावंतवाडी : अल्पसंख्यांक भाजप सेलचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांच्या माध्यमातून येथील नगरपरिषद समोर उभारण्यात आलेली मिनी पोलीस चौकी अखेर शुक्रवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. दरम्यान या  मिनी पोलीस चौकीसाठी नगरपरिषदेची परवानगी नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे नगरपरिषदकडून स्पष्ट करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या मिनी पोलीस चौकीचे उद्घाटन सकाळीच माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले होते. सावंतवाडी नगरपरिषद समोर निलेश राणे च्या वाढदिवसाचे औचित्य साधून रफिक शेख यांनी मिनी पोलीस चौकी उभारली होती.गेली अनेक वर्षं पोलीस उन्हात थांबतात त्यांना उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात सुरक्षिता असावी म्हणून ही पोलीस चौकी उभारण्यात आली होती.मात्र ही पोलीस चौकी नगरपरिषद च्या हद्दीत उभारून ही नगरपरिषद कडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.त्यातच या पोलीस चौकीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काल, शुक्रवारी सकाळीच उद्घाटन केले होते. मात्र सायंकाळी नगरपरिषदेने परवानगी बाबत सर्व कागदपत्रांची छाननी केली पण कोणतीही परवानगी आढळून आली नाही.त्यानंतर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी पोलीस बंदोबस्तात ही मिनी पोलीस चौकी हटविण्याचे आदेश दिले.त्यानुसार नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून ही मिनी पोलीस चौकी हटविण्यात आली.याबाबत नगरपरिषद कर्मचारी मनोज राऊळ यांना विचारले असता पोलीस चौकी उभारण्या बाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी