शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बांद्यातून मायनिंगच्या अधिकाऱ्यांचा पोबारा

By admin | Published: November 29, 2015 1:08 AM

गोव्यातून गुपचूप येत पाहणी : ग्रामस्थांकडून पाठलाग

बांदा : राज्य शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचलनालयाने जाहीर केलेल्या खनिज पट्ट्यातील प्रस्तावित बांदा व डेगवे गावांतील लोहखनिज लीजची पाहणी करण्यासाठी गोवा येथील मायनिंग कंपनीचे अधिकारी शनिवारी सकाळीच आलिशान कारमधून गुपचूप आले होते. स्थानिकांचा विरोध होण्याच्या शक्यतेने हा दौरा पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला होता. मात्र, स्थानिकांना याची कुणकुण लागताच संबंधित अधिकाऱ्यांनी तेथून पोबारा केला. या दौऱ्याबाबत महसूल विभागालादेखील अंधारात ठेवण्यात आले होते. खनिकर्म संचलनालयाने स्थानिकांना विश्वासात न घेता बांदा व डेगवे गावांत लीज देत या सर्व्हेमधील लोहखनिज उत्खनन करण्यासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. या दोन्ही गावांतील सुमारे १०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात लोहखनिजाचे उत्खनन केले जाणार आहे. यासाठी नवीन खनिज सुधार कायद्यानुसार राज्य शासनाने बांदा व डेगवे गावातील लोहखनीज उत्खननासाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, डेगवे ग्रामस्थांनी याला पूर्णपणे विरोधाची भूमिका ठेवत शासनाने या गावावर खनिज प्रकल्प लादल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी) स्थानिकांकडून जंगलात पाठलाग ४दरम्यान, संबंधित अधिकारी पानवळ येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या मागे असलेल्या डोंगराळ भागात सर्वेक्षणासाठी गेले. हा परिसर शेती-बागायतींनी समृद्ध आहे. खनिज कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आल्याची कुणकुण लागताच स्थानिक युवकांनी त्यांचा जंगलात पाठलाग केला. हे कळताच अधिकाऱ्यांनी तेथून पोबारा केला. तलाठ्यांचे कानावर हात ४याबाबत बांदा येथील तलाठी कार्यालयात संपर्क केला असता आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. स्थानिकांनी प्रस्तावित खनिज प्रकल्पाला विरोध दर्शविल्याने भविष्यात या ठिकाणी शासन विरुद्ध ग्रामस्थ यांच्यात संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.