सावंतवाडी : आरोस - नाबरवाडीमध्ये सेवा बजावत असताना विद्युत खांबावर मृत्यू झालेल्या अमोल भरत कळंगुटकर यांच्या कुटुंबीयांना वीज अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपये मदत दिली असली तरी ठेकेदाराकडून अद्याप पर्यत एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संताप व्यक्त केला.त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयाना मदत देण्यात बाबतचा निर्णय दोन दिवसात घ्या अन्यथा शासन तुमच्यावर कारवाई करेल तसेच घटनेला जबाबदार धरून कायदेशीर प्रकिया हाती घेऊ असा सज्जड दम मंत्री केसरकर यांनी विद्युत ठेकेदार हानीफ तांबोळी यांना दिला आहे. तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनीही आपण लवकरच बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.वीजसेवा बजावताना मृत्यू झालेल्या आरोस गावातील घटना ही जिल्ह्यात सातवी घटना आहे. महावितरणकडून त्यांच्या वारसांना फक्त दोन लाख रूपयांची मदत दिली आहे कुडाळ येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रकाश तनपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे अमोलच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश महावितरणकडून सुपूर्द करण्यात आला. मात्र ठेकेदाराकडून अद्याप पर्यत एक रूपयांची ही मदत दिली नाही.या विषयावरुन च आरोस ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याचे लक्ष वेधले यावरून मंत्री केसरकर यांनी विद्युत ठेकेदार यांची चांगलीच कानउघडणी केली तुम्ही किती मदत देणार ते सांगा कुटूंबातील एक सदस्य गेला आहे.त्यामुळे त्याला मदत दिली जावी माझ्या माध्यमातून मी मदत देणारच पण तुम्ही मदत लवकरात लवकर द्या अशी विनंती केली.मंत्री केसरकर याच्या सूचनेनंतर ही ठेकेदाराकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मंत्री केसरकर हे चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी थेट ठेकेदाराकडून ठेका काढून घ्या आणि नवीन प्रकिया राबवा अशा सुचना विद्युत अधिकाऱ्यांना केल्या तसेच मदत दिली गेली नाही तर पोलिसात तक्रार द्या अशी सुचना ही दिली.त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी मी स्वता दोन दिवसात बैठक घेतो असे सांगितले.
कंत्राटी वायरमन मृत्यू प्रकरणावरून मंत्री दीपक केसरकर संतप्त, ठेकेदाराची केली कानउघडणी
By अनंत खं.जाधव | Published: October 21, 2023 3:40 PM