शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

By अनंत खं.जाधव | Published: March 11, 2023 4:38 PM

सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार करावा

सावंतवाडी : आम्हाला पन्नास खोके म्हणता मग एवढी वर्षे तुम्ही काय करत होता. मुंबईतील खोके बंद झाल्यानेच उद्धव ठाकरेची चिडचिड होत आहे. पण आता गप्प बसणार नाही खोक्याना त्याच भाषेत उत्तर देणार असून मागील पाच वर्षांत माझी मालमत्ता विकून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष चालवला त्यावेळी खोके कुठे गेले असा सवाल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी करत ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.ते शिवसेना शिंदे गटाकडून सावंतवाडीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, माजी खासदार सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, सचिन वालावलकर, गणेशप्रसाद गवस, नितीन मांजरेकर, अनारोजीन लोबो, सचिन देसाई, प्रेमानंद देसाई, सुनिल डुबळे उपस्थित होते.केसरकर म्हणाले, आमच्यावर खोक्याचे आरोप करता मग तुम्ही आतापर्यंत घेतलेले खोके कुठे ठेवले. मुंबई मधून किती खोके मिळत होते. पदे द्यायला किती खोके घेता असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. ठाकरे पिता-पूत्र जेव्हा आमच्यावर टिका करतात त्यावेळी याच्याबाबत सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा सल्लाही केसरकरांनी दिला. तसेच सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना आडाळी येथे गरज नसताना धरण बांधण्यात आले याला जबाबदार कोण आणि लोक रस्त्यावर उतरले असते तर काय झाले असते याचा विचार करा असे म्हणत देसाईंवरही टीकास्त्र सोडले. यापुढे जिल्हा परिषद निहाय दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रविंद्र फाटक म्हणाले, पक्ष संघटना वाढवली तरच आपणास याचा फायदा होणार आहे. प्रत्येकाने तळागाळात जाऊन संघटना वाढण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी सर्व निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. मी सतत या भागाचा दौरा करेन आणि याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या जिल्ह्यात येण्याची विनंती करेन असेही सांगितले.सुधीर सावंत म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. अनेक विकासात्मक कामे त्यांच्या हातून मागील सहा महिन्यात या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन सावंत यांनी केले.दरम्यान, आजगाव सरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर या निमित्ताने महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गचे संपर्क प्रमुख म्हणून रविंद्र फाटक यांची निवड झाल्याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे