सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काही जमीन खरेदी करणारे आले आहेत. त्याचा कदाचित कावळेसाद पॉइंट वरच्या जमिनीवर डोळा असेल म्हणूनच ते माझ्याबद्दल गैरसमज पसरवित आहेत. पण मी मंदिरात येऊन सांगतो की माझा याप्रकरणाशी काडीशीही संबध नाही त्यामुळे मला यात ओढू नका. मी काल आज आणि उद्या ग्रामस्थासोबतच आहे. त्यामुळे मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे शालेय शिक्षण तथा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. गेळे येथील ग्रामस्थांनी रविवारी बैठक घेऊन कावळेसाद पॉइंटवरील जमिनी वरून केसरकर यांना गावबंदीचा इशारा दिला होता. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर देत अप्रत्यक्ष तालूका मंडळ अध्यक्ष संदीप गावडे वर टीकास्त्र सोडले आहे.केसरकर म्हणाले, कावळेसात पॉईंटवरील जमिनीवरून ग्रामस्थांमध्ये जो काही गैरसमज आहे तो निश्चित दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मुद्दामहून त्यांच्या कोणतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे हे योग्य नाही. कावळेसाद पॉईंट वरील सर्व जमीन शासन पर्यटन प्रकल्पासाठी घेईलच असे नाही. जर त्यातील उर्वरित जमीन शिल्लक राहिली तर ती जमीन निश्चितच ग्रामस्थांना दिली जाईल.आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता.या जमीनीवर आज पर्यत महाराष्ट्र शासनाची वहिवाट आहे. अशा जमीनीचे कधीही वाटप होत नाही पण जमीनी शेतकऱ्यांना. मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात येऊन नारळाला हात लावण्यास मी तयार आहे.असे आवाहन केसरकर यांनी दिले आहे.फक्त आंबोली व गेळे ग्रामस्थांचं एकच म्हणणं होतं की खाजगी जमीन वाटप करतना वन संबंधित जमीन ही वाटली जावी त्यामुळेच एवढे दिवस या जमीन वाटपाचा प्रश्न राहिला होता पण आता काहीजण नव्याने जमीन वाटप करतो म्हणून पुढे आले आहेत.त्यांना मला एकच सांगायचे आहे की आमचे या गावांशी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत आज तुम्ही त्यांना माझ्याबद्दल गैरसमज पसरवून वेगळे करू शकता पण हे फार काळ टिकणार नाही.लोकांना समजून चुकेल की.. केव्हा ना केव्हातरी लोकांना समजून चुकेल की कोण खरे आणि कोण खोटे मी मंदिरात येऊन नारळावर हात ठेवून सांगेन की यामध्ये मी ग्रामस्थांसाठी काय काय केले ते आता काहिसा या कावळेसाद पॉइंटवरील जमिनीवर डोळा असेल म्हणूनच हे सर्व चालले आहे असा संशय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत, कावळेसाद ग्रामस्थांच्या इशाऱ्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
By अनंत खं.जाधव | Published: July 29, 2024 5:14 PM