शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; भेटीची वेळ मागितली, कारण...
2
Hit and Run: वाढदिवसाचा केक घेऊन निघाला अन् वाटेतच..., BMW ने उडवतानाचा Video आला समोर
3
अटल सेतूमार्गे थेट पुणे बंगळुरू नवीन हायवे; नितीन गडकरींचा प्लॅन, कसा असेल हा रोड?
4
भयंकर! मोबाईलवर कार्टून पाहत होता मुलगा, अचानक झाला स्फोट; तुम्ही करू नका 'ही' चूक
5
...तर 'तुंबाड'मध्ये हस्तरच्या भूमिकेत दिसला असता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्यानेच केलेला खुलासा, म्हणाला...
6
धनगर-धनगड एकच असल्याच्या जीआरला झिरवाळांचा विरोध; म्हणाले, "आरक्षण द्या, पण आमच्यातून नको"
7
सिद्धू मूसेवालाच्या छोट्या भावाचा व्हिडिओ पाहिलात का?, वयाच्या ५८ व्या वर्षी आईने दिला बाळाला जन्म
8
"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम
9
भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला बसलेल्या ९ जणांना चिरडले, ५ जणांचा मृत्यू , उत्तर प्रदेशमधील संभल येथे भीषण अपघात  
10
'वंदे भारत' मेट्रोचं नाव बदललं, आता 'नमो भारत रॅपिड रेल' नावानं ओळखली जाणार, रेल्वेचा मोठा निर्णय
11
लाडक्या बहिणींच्या सुरक्षेबाबत शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, १०० टक्के…
12
बाबो! टेस्लाच्या ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी लागले १.९० लाख लीटर पाणी; उष्णता, धूर एवढा की... 
13
Adani News : अदानींच्या शेअर्समध्ये तेजी, महाराष्ट्रातून मिळालेल्या मोठ्या प्रकल्पानंतर गुंतवणूकदारांच्या उड्या
14
मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन
15
Blinkit, Zepto वरुन खरेदी करणाऱ्यांवर सरकारची नजर! मागितला जाऊ शकतो डेटा, कारण काय?
16
राजकीय निवृत्तीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाही..." 
17
Anant Chaturdashi 2024: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा व्यंकटेश स्तोत्र!
18
'अशी ही बनवाबनवी'मधील ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध ही खरी घटना, सचिन पिळगावकरांचा खुलासा
19
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खलिस्तानला पाठिंबा मिळेल, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा दावा 
20
मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित

केसरकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, अन्यथा..; भाजप पदाधिकाऱ्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 1:17 PM

दीपक केसरकर किती खोटारडे आहेत, हे सर्व जनतेला ज्ञात

दोडामार्ग : राज्यात आत्ताच भाजपा-शिंदे गट युतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आपलेच सरकार असल्यागत वागत आहेत. भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता युतीची बंधने धुडकारत थंड दहशतवादाने अपरोक्ष त्रास देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी युतीचा धर्म पाळावा. मुखात देवाचे नाव घेणाऱ्यांनी सज्जनता दाखवावी आणि जनतेला भूलथापा मारू नये. ते असेच वागत राहिल्यास आम्ही प्रखर विरोधात उतरू, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिला आहे.मंगळवारी येथील स्नेह रेसिडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगरसेवक संतोष नानचे, चंदू मळीक उपस्थित होते.दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे गेली १३ वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. या कार्यकाळात त्यांनी कोणता प्रकल्प आणला, तो सांगावा. फक्त प्रकल्पांची घोषणा करायची आणि शांत बसायचे, हे त्यांचे समीकरण. शिवसेना-भाजपा सरकारमध्ये असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रकल्पांची घोषणा केली. त्याचे पुढे काय झाले?तिलारी धरणाच्या खालच्या बाजूला अमेरिकन कंपनीची गुंतवणूक करून एक प्रकल्प आणायचा होता, त्याचा तर थांगपत्ता नसताना धरण परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा ॲम्युझमेंट पार्क करत आहेत.केसरकर हे केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आमदार म्हणून ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.भाजप पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून वैयक्तिक पातळीवर  त्रास देत आहेत. केसरकरांचे हे वागणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे निवडणुकीत वेगळा निर्णय घ्यावा लागेल. ज्या पद्धतीने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी त्रास देण्याचे काम चालू आहे ते अयोग्य आहे. याबाबत रीतसर तक्रार भाजपा वरिष्ठांकडे आम्ही देणार आहोत. विकासकामांच्या नावाने भूलथापा मारणे बंद करा, असा इशारा दिला दिला आहे.सडेतोड उत्तर देणारदीपक केसरकर किती खोटारडे आहेत, हे सर्व जनतेला ज्ञात आहे. अनेकांना याचा अनुभवदेखील आला आहे. आम्ही भाजपामध्येच आहोत. त्यांनी कितीही प्रलोभने दिली तरीदेखील आम्ही भाजपातच राहणार. आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे, याला आम्ही भीत नाही. योग्यवेळी सडेतोड उत्तर देणार असल्याचे भाजपाचे नगरसेवक संतोष नानचे म्हणाले.५० टक्के सवलत देण्याच्या घोषणा आडाळी एमआयडीसीतील एक गुंठा जमिनीला शासनाने १ लाख २८ हजार भूखंडाचा दर निश्चित केला आहे. त्याच भूखंडांना दीपक केसरकर ५० टक्के सवलत देणार असल्याच्या घोषणा देत आहेत. हिंमत असेल तर एवढी सवलत त्यांनी देऊन दाखवावीच, असे खुले आव्हान राजेंद्र म्हापसेकर यांनी दिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर BJPभाजपा