ओरोस : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रमोद मधुकर परब (५१ रा. पडवे) याला विशेष न्यायाधीश सानिका जोशी यांनी दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.कुडाळ तालुक्यातील पडवे येथील प्रमोद मधुकर परब यांनी १२ मार्च २०२१ रोजी आणि १६ एप्रिल २०२१ रोजी कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले होते. यातून पीडित अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली होती. या प्रकरणी ४ मे २०२१ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात भा.दं.वि कलम ३७६(१), ३७६(२), एफ, जे. एन, ३७६(३) सह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.११ साक्षीदार तपासलेया प्रकरणी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल, साक्षीदारांची साक्ष आणि वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने प्रमोद परब यांना दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
Sindhudurg: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 31, 2024 6:49 PM