सावंतवाडी : तालुक्यातील विलवडे टेंबवाडी येथील मीरा कृष्णा सावंत ( ६५) यांचे सोमवारी सकाळी ६.३० वाजता हृदय विकारांच्या धक्क्याने निधन झाले.त्याच्या आकस्मिक निधनाने सावंत कुटुंबियांसह सर्वानाच धक्का बसला.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेऊन सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. दुपारी १२:३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, दोन मुली, दोन दिर, भावजय, पुतणे, पुतणी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती कृष्णा सावंत यांच्या त्या पत्नी, पं. स. सावंतवाडी चालक गुणाजी उर्फ रुपेश सावंत यांच्या आई तर विलवडे हायस्कूलचे निवृत्त लिपिक सुरेश सावंत व मनोहर सावंत यांच्या त्या भावजय होत. तसेच विलवडे शाळा नं १ च्या मुख्याध्यापिका सुप्रिया सावंत यांच्या जाऊ होत.