कुडाळ : तालुक्यातील साळगाव जांभरमळा येथील शशिकांत प्रदीप धुरी (२३) या युवकाचा शोध कुडाळ पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून घेत त्याला वेर्णा गोवा येथून कुडाळ येथे आणले. तो २३ डिसेंबरपासून बेपत्ता होता.याबाबत सविस्तर वृत्त असे की, साळगाव हायस्कूलजवळ राहणाऱ्या शशिकांत हा २३ डिसेंबरला पहाटे ५ ते ७ या वेळेत कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. मात्र, अद्यापही तो घरी परतला नाही त्यामुळे याबाबत तो बेपत्ता असल्याची खबर त्याच्या वडिलांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती.शशिकांतकडे दोन मोबाईल आहे ते दोन्ही मोबाईल गेले दोन दिवस स्वीच ऑफ येत होते. या प्रकरणी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मंगेश शिंगाडे व बाळकृष्ण घाडीगावकर हे शशिकांतचा शोध घेत होते. दरम्यान, शशिकांत हा नोकरीला पुणे येथे जाण्यास इच्छुक होता त्यामुळे तो पुण्याला गेला आहे का? याचा ही तपास पोलीस घेतला मात्र काही निष्पन्न झाले नव्हते.दरम्यान, शशिकांत यांच्याकडे बंद असलेल्या दोन मोबाईलपैकी एक मोबाईल काहीवेळाकरीता सुरू झाला होता. त्या मोबाईलच्या लोकेशनद्वारा तपास केला असता गोवा वेर्णा येथे लोकेशन दाखविण्यात आले. त्यामुळे कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगाडे व घाडीगावकर यांनी गोवा वेर्णा येथे जात एका कंपनीत शशिकांत सापडला. त्याला कुडाळ येथे आणण्यात आले आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
साळगावमधील बेपत्ता युवक गोवा येथे सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 17:50 IST
Crimenews Kudal police sindhudurg- कुडाळ तालुक्यातील साळगाव जांभरमळा येथील शशिकांत प्रदीप धुरी (२३) या युवकाचा शोध कुडाळ पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून घेत त्याला वेर्णा गोवा येथून कुडाळ येथे आणले. तो २३ डिसेंबरपासून बेपत्ता होता.
साळगावमधील बेपत्ता युवक गोवा येथे सापडला
ठळक मुद्देसाळगावमधील बेपत्ता युवक गोवा येथे सापडला२३ डिसेंबरपासून होता बेपत्ता