Maharashtra Politics ( Marathi News ) : रविवारी भारत पाकिस्तान सामना झाला. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर सिंधुदुर्गमध्ये भारताविरोधी घोषणा दिल्याचे समोर आले. या घोषणा एका भंगारवाल्याने दिल्या होत्या. दरम्यान, आता या भंगारवाल्याविरोधात प्रशासन अॅक्शमोडवर आले आहे. शिवसेना आमदार निलेश राणे आणि प्रशासनाने या भंगारवाल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. जेसीबीने मालवण शहरातील आडवण येथील भंगारवाल्याचे बांधकाम पाडले.
'ऑपरेशन टायगर'! कोल्हापूरात माजी आमदार धनुष्यबाण हाती घेणार; शिंदे कुणाला धक्का देणार?
शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्या व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. प्रकरण वाढल्यानंतर मालवण नगरपरिषद प्रशासनाने आरोपी व्यावसायिकाचे भंगारचे दुकान बुलडोझरने पाडले. भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान रोहित शर्माने विकेट घेतल्यानंतर त्या भंगारवाल्याने 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. शिवसेना नेते निलेश राणे यांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.
आमदार निलेश राणे यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यानी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार.'
रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये दोन लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. स्थानिक लोकांनी विरोध केल्यावर वाद सुरू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, त्यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी सकाळी, शहरातील बेकायदेशीर बांगलादेशी आणि स्थलांतरित स्थायिकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी रॅली काढली.