कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ल्यातील आरोपी असलेले आमदार नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परबला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.राकेश परबला ३१ जानेवारी रोजी कणकवली पोलिसांनी सायंकाळी अटक केली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजता परब याना कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने राकेश परबला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.कणकवली न्यायालयात सहकारी पक्षातर्फे १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये अन्य आरोपींना अटक करणे, मोबाईल हस्तगत करणे, ही कारणे न्यायालयासमोर ठेवण्यात आली. मात्र न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर करीत आहेत.
आमदार नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परबला ४ दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 11:04 IST