शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी, वैभव नाईकांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: December 13, 2022 16:38 IST

सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती

कणकवली : सिंधुदुर्गात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती करण्यात येत आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे पॅनेल उभे राहिल्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते प्रचार सभांमध्ये मतदारांना दमदाटी करीत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.कणकवली येथील विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची आज, मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, रुपेश आमडोसकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महिला आघाडी प्रमुख उर्वी साटम, तालुका अध्यक्ष संजय जाधव, अक्षय कदम, युवा आघाडी प्रमुख रोहन कदम, सुरेंद्र कदम आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आघाडी जिल्ह्यात झाली आहे. भाजपला रोखण्यासाठी तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी करण्याठी एकत्रित मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा विरोधात २९० ठिकाणी थेट लढत होत आहे. आमच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. राज्यातील सद्याचे सरकार किती काळ टिकणार हे केवळ न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकेल. नारायण राणेंनी जिल्ह्यात किती उद्योग आणलेनारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात किती उद्योग आणले? ग्रामपंचायत मध्ये सत्ता असलेल्या त्यांच्या लोकांनी आतापर्यंत काय विकास केला? हे जनतेने विचारण्याची गरज आहे. भाजपच्या माध्यमातून निधी नाही. भाजपाकडून काही ठिकाणी दडपशाहीच्या मार्गतून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाला आहे. नितेश राणे धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लोक धमक्यांना भीक घालणार नाहीत.महेश परुळेकर म्हणाले, जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक  चुकीची वक्तव्ये करीत आहेत. सिंधुदुर्ग हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. त्याचे नाव बदनाम केले जात आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे १२ सरपंच पदाचे उमेदवार आणि १०० पेक्षा जास्त सदस्य ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत.ते निश्चितच विजयी होतील. असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे