कणकवली : राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ उडाली. शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार ‘नॉट रिचेबल’ असल्याने राज्यातील राजकारणात वादळ उठले. यासर्व घडामोडींवर शिवसेना नेते संजय राऊत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. दोन आमदारांचे अपहरण करण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.यातच कोकणातील उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू आमदार म्हणून ओळख असणारे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या व्हाट्सअप प्रोफाईलला ठेवलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांचा फोटो असणाऱ्या या पोस्टमध्ये “काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे”. असा उल्लेख या पोस्ट मध्ये केला आहे.आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत. तसेच शिवसेनेला डिवचणार्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केल्यामुळे शिवसेनेमध्ये वैभव नाईक या नावाला विशिष्ट वजन आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांची व्हाट्सअप पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
'काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे'! शिवसेना आमदाराची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:53 IST