शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कंपनीची मेहरबानी नाही, ओसरगाव टोल माफीवरुन मनसे नेते परशुराम उपरकरांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 5:28 PM

कंपनीच्या मेहरबानीचे पत्र जे आमदार दाखवतात ,त्यांच्याच मतदारसंघातील जनतेला या टोलचा सर्वाधिक भुर्दंड

सुधीर राणे

कणकवली: सिंधुदुर्ग मधील जनतेला ओसरगाव येथील टोल नाक्यावरून टोल माफी देण्याचे पत्र जिल्हाधिकारी किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यायला हवे. स्थानिक आमदारांकडून टोल वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीकडून गणेशोत्सव कालावधीत टोल माफी मिळवून दिल्याचे भासविले जात आहे. तर दुसरीकडे टोल वसुलीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत असल्याचेही दिसत आहे. जिल्ह्यातील जनतेने याचा निषेध करायला हवा. अशा प्रकारे टोल वसुली सुरू झाल्यास मनसे आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.याबाबत उपरकरांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ज्या ठेकेदार कंपनीकडून स्थानिक आमदार पत्र घेत गणेशोत्सव कालावधीत कंपनी एम एच ०७ च्या सफेद नंबर प्लेट असलेल्या गाड्यांना टोल माफी देत मेहरबानी करत असल्याचे भासवत आहेत. मुळात संबंधित कंपनीला तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हा ठेका देण्यात आला होते. त्याची मुदत आठवड्याभराने संपणार आहे. आठवड्याभरात मुदत संपत असताना गणेशोत्सव कालावधीत टोल माफी देत असल्याचे कंपनीचे म्हणणे व स्थानिक आमदारांचा त्याला दुजोरा हे संशयास्पद आहे. मुळात राज्यभरातील टोलनाक्यांवर गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफी मिळते ती राज्य सरकारकडून, त्यात कुठल्याही कंपनीची मेहरबानी नाही.पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील चाळकवाडी येथे असलेल्या टोल नाक्यावरून स्थानिक वाहनांसाठी पूर्णतः टोल फ्रीचे आदेश तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. अशाच प्रकारे ओसरगाव येथील टोलनाक्यावर सिंधुदुर्ग मधील जनतेला टोल माफी मिळायलाच हवी अशी आमची मागणी आहे. कंपनीच्या मेहरबानीचे पत्र जे आमदार दाखवतात ,त्यांच्याच मतदारसंघातील जनतेला या टोलचा सर्वाधिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. असे असतानाही हे आमदार कंपनीच्या बाजूने असल्याचे दाखवून मतदार संघातील व जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात करत आहेत. अशांना जनतेने योग्य जागा दाखवण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रकारे टोल वसुली सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे गप्प बसणार नाही असेही परशुराम उपरकरांनी म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाकाMNSमनसे