शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

आधुनिक युगातही मालवणी भाषा टिकून

By admin | Published: May 22, 2016 12:28 AM

सत्वशिलादेवी भोसलेंचे गौरवोद्गार : मालवणी करंडक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

सावंतवाडी : अत्याधुनिक युगात आपण मालवणी भाषा टिकवून ठेवत आहोत. मालवणी भाषेला अनेक ठिकाणी मागणी आहे. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. तरीही मालवणी करंडक महोत्सवाच्या माध्यमातून मालवणी टिकवण्याचे खरे धाडस सर्वांनी केले. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे मत सावंतवाडीच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी मांडले. ओंकार कलामंच व भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानच्यावतीने येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या मालवणी करंडक एकांकिका महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पोलिस निरीक्षक रणजित देसाई, नाट्य अभिनेते लवराज कांबळी, डी. के. सावंत, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, दादा मडकईकर, अध्यक्ष अमोल टेमकर, विक्रांत सावंत, अभिमन्यू लोंढे, अरविंद शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजमाता सत्वशिलादेवी भोसले म्हणाल्या, मालवणी एकांकिकांच्या माध्यमातून मालवणी टिकवणे ही काळाची गरज आहे. मालवणी टिकली पाहिजे हेच मत सर्वांचे आहे. मोबाईल व इंटरनेटच्या काळात तसेच आधुनिक युगात आपली भाषा टिकली आहे. मालवणी भाषा ही अनेक माध्यमांतून देशासह देशाबाहेर गेली. याचे आम्हाला कौतुक असून, यापुढेही मालवणीसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन राजमातांनी केले. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मोबाईल, इंटरनेटचा वापर करीत असतो. अशा वेळी त्यांनी आपली मालवणी भाषा ही या माध्यमातून पुढे सरकवणे गरजेचे असल्याचे राजमाता भोसले म्हणाल्या. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, महोत्सवाचे नाव बदलले तरी या महोत्सवाची शोभा मात्र किंचितही कमी झाली नाही. मोठ्या व्यक्तीचे आदराने नाव घेतो. विविध शहरात मोठमोठे महोत्सव होत असतात. त्यावेळी त्या नावांना विरोध होत नाही. मग आताच विरोध का, असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. याचे सर्व श्रेय सावंतवाडी राजघराण्याला देणेच योग्य ठरणार असून, संस्थानकाळापासूनच राजघराण्याने कलेला आश्रय दिला, असेही यावेळी नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले. नाट्य अभिनेते लवराज कांबळी म्हणाले, कोकणात अनेक नटसम्राट झाले. याचे श्रेय मालवणी भाषेलाच दिले पाहिजे आणि नाट्यकलेला जाते. दशावतार नाटके ही कोकणातील कलाकरांची नाट्यशाळाच आहे, असे सांगत मालवणी भाषेला वेगळा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी अभिनेते कांबळी यांनी सांगितले. तसेच अशा कार्यक्रमांना सरकारी निधी उपलब्ध व्हावा, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालवणी करंडकची सुरूवात मालवणी गायनाने मालवणी कवी दादा मडकईकर यांनी केली. तर उपस्थितांचे स्वागत अमोल टेमकर, विक्रांत सावंत, रूजूल पाटणकर, मिलिंद कासार, निरंजन सांवत यांनी केले. आभार हसन खान यांनी मानले. मालवणी करंडकच्या निमित्ताने येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात प्रसिध्द छायाचित्रकार अनिल भिसे यांचे छायाचित्र प्रदर्शन ठेवण्यात आले असून अनेकांनी भेट देऊन त्याचे कौतुक केले. (प्रतिनिधी)