बांदा : बांदा शहरातील सटमटवाडी येथे काजूच्या बागेत मृत माकड सापडले. मात्र, माकडाचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नाही. सटमटवाडी हे माकडताप बाधित क्षेत्र असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी मृत माकडाची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ मृत माकडाची विल्हेवाट लावली.शेतकऱ्यांनी काजू बागायतीत जाताना अंगाला डीएमपी ऑइल लावूनच काजू गोळा करण्यासाठी जावे, बागायतीतून घरी आल्यावर आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. नागरिकांनि विनाकारण घाबरुन जावू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये. काही शंका असल्यास बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क करा. असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.तीन वर्षांपूर्वी सटमटवाडीत माजविला होता हाहाकारफेब्रुवारी महिन्यात बांदा आरोग्य विभागाने सटमटवाडीतील शेतकऱ्यांना डीएमपी ऑइलचे वाटप केले होते.मृत माकड सापडलेल्या परिसरात दूषित गोचिडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मेलेथीन पावडरची फवारणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. यावर्षी मृत माकड मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. तीन वर्षांपूर्वी सटमटवाडीत माकडतापाने हाहाकार माजविला होता.
माकडतापबाधित क्षेत्र : बांदा सटमटवाडीत मृत माकड आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 1:46 PM
Monkey sindhudurg- बांदा शहरातील सटमटवाडी येथे काजूच्या बागेत मृत माकड सापडले. मात्र, माकडाचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नाही. सटमटवाडी हे माकडताप बाधित क्षेत्र असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी मृत माकडाची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ मृत माकडाची विल्हेवाट लावली.
ठळक मुद्देमाकडतापबाधित क्षेत्र : बांदा सटमटवाडीत मृत माकड आढळले प्रशासनाकडून आवश्यक काळजी