कणकवली: हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळपासूनच किनारपट्टीवरील मालवणात व वेंगुर्ल्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.५५ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २८८.४ मिमी पाऊस झाला आहे.केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील आठवडाभरात महाराष्ट्रात दाखल होतो. महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मग मान्सूनची वाटचाल पुढे मुंबई व इतर भागात होते. येत्या दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार गुरुवार सकाळपासूनच सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्यासारखी स्थिती होती. मागील २४ तासात जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाची आकडेवारीमध्ये दोडामार्ग २८ (२८0), सावंतवाडी निरंक (२८३), वेंगुर्ला ६.४(३३९.२), कुडाळ २५ (२२७), मालवण १४ (३५२), कणकवली १५ (१९0), देवगड २६ (३३३), वैभववाडी १0 (३0३) असा पाऊस झाला आहे.शेतकरी, बागायतदार सुखावलासकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने मान्सूनची वाट पाहणारा शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी अधूनमधून दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे ठिकठिकाणच्या बाजारपेठांमधील गर्दीदेखील ओसरली. शेतक-यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. तर काजू व कलम बागायदारांनी बागयतीमध्ये मशागतीच्या कामाला तसेच झाडांना खत घालण्यास सुरुवात केली.
हेही वाचा
Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा
...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी
आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट
चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'
...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार
51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार