सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमपर्यंत जादा रेल्वेगाड्या ६ ते २३ सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.मुंबई सेंट्रल-मंगळूर जंक्शन ते मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल येथून १२ व १९ सप्टेंबरला रात्री २३.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १९.३० वाजता मंगळूरला पोहोचेल. तेथून गाडी क्र. ०९००२ मंगळूरहून गुरुवार १३ आणि २० सप्टेंबरला रात्री २३.१० वाजता सुटून मुंबई सेंट्रलला सकाळी ७ वाजता पोहोचेल.
बांद्रा ते मंगळूरू विशेष गाडी क्रमांक ०९००९ बांद्रा येथून ११ आणि १८ सप्टेंबरला रात्री २३.५५ वाजता सुटेल. मंगळूरु जंक्शन येथून १२ आणि १९ सप्टेंबरला रात्री २३.१० वाजता सुटेल.तसेच बांद्रा ते मंगळूरु वातानुकुलीत विशेष गाडी क्रमांक ०९०११ ही बांद्रातून ९, १६ आणि २३ सप्टेंबरला रात्री २३.५५ वाजता सुटेल. परतीसाठी मंगळूरहून १०, १७ आणि २४ सप्टेंबरला रात्री २३.१० वाजता सुटेल. अहमदाबाद ते थिविम ही विशेष गाडी ०९४९ अहमदाबाद येथून सायंकाळी १६.१५ वाजता शुक्रवारी ७, १४ आणि २१ सप्टेंबरला सुटेल. परतीसाठी ०९४१७ थिवीम येथून शनिवारी ८, १५ आणि २२ सप्टेंबरला सायंकाळी १६.३० वाजता सुटेल.अहमदाबाद-मडगाव शहर विशेष गाडी क्र. ०९४१६ अहमदाबाद येथून मंगळवार ११ आणि १८ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०९४१५ मडगांव जंक्शन येथून बुधवारी १२ आणि १, ९ सप्टेंबरला सायंकाळी १८.०० वाजता सुटेल.मुंबई सेंट्रल ते थिविम विशेष गाडी असून गाडी क्रमांक ०९००७ मुंबई सेंट्रल येथून सायंकाळी ६ वाजता सुटणार आहे. ही गाडी ८, १०, १३, १५, १७, २० व २२ सप्टेंबरला निघेल. गाडी क्रमांक ०९००८ थिविम येथून ७, ९, ११, १४, १६, १८, २१ व २३ सप्टेंबरला थिवीमहून निघणार आहे.नव्या गाड्यांमध्ये आरक्षणाची आशादरम्यान, यापूर्वी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांचे तरी आरक्षण आपल्याला मिळेल, अशी आशा अनेक भाविकांना लागून राहिलीआहे.