कुडाळ : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणा घर जावुनही त्याचा मोबदला दिलेल्या मुदतीत न दिल्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये सदरच्या कार्यालयातील प्रांताधिकारी यांच्या खुर्ची सहित इतर सर्व साहित्य कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले होते. जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सर्व साहित्य जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की पावशी येथील राजू मेहता व त्यांची पत्नी सुप्रिया मेहता यांचे घर त्यांची काही जमीन मुंबई महामार्ग चौपदरी करण्यात येत असल्यामुळे सदरच्या बंगल्याचे मूल्यांकन करून कुडाळ प्रांत अधिकारी कार्यालयाकडून मेहता यांना सुमारे 23 लाख 92 हजार 426 रुपये अदा करण्यात आले होते.मात्र ही रक्कम इमारती पेक्षा कमी आहे. त्यामुळे मेहता यांनी याबाबत जिल्हाधिकारी लवादाकडे तक्रार अर्ज करून वाढीव रक्कम मिळावी अशी मागणी केली होती. सदरच्या मेहता यांच्या तक्रार अजार्चा जिल्हा लवादाने विचार करत मेहता यांना वाढीव रक्कम देण्यात यावी असे कुडाळ प्रांत अधिकारी कार्यालयाला कळवले होते.मात्र न्यायालयाचा आदेश असतानाही मेहता यांना ही रक्कम प्रांत अधिकारी कार्यालयाकडून अदा केली नव्हती. त्यामुळे मेहता यांनी याबाबत सिंधुदुर्ग प्रधान जिल्हा न्यायालयाकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्ज नंतर जिल्हा न्यायालयाने सदरची रक्कम अदा न केल्यास अधिकारी कार्यालयातील सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी असे आदेश दिनांक 2 जानेवारी रोजी काढले होते.
असे आदेश निघूनही प्रांत अधिकारी कार्यालयाकडून सदरची रक्कम देण्याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे सुप्रिया मेहता यांनी सदरच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्याची कार्यवाही सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात कर्मचा?्यांना घेऊन सुरू केली.यावेळी प्रांताधिकारी यांची खुर्ची सहीत इतर खुर्च्या टेबल हे सर्व साहित्य कार्यालयाच्या बाहेर आणण्यात आले न्यायालयाने प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्तेमध्ये गोदरेज कपाटे 14 (सुमारे दोन लाख 80 हजार), आॅफिस टेबल 2 (सुमारे 75 हजार रुपए), खुर्च्या पाच (2 लाख रुपये), दोन सोपे (दीड लाख रुपये), कॉम्प्युटर टेबल 12 (1 लाख 50 हजार रुपये), एसी (3 लाख), फॅन सात (तीस हजार रुपये), प्रिंटर 12 (3 लाख रुपये), स्टील खुर्च्या 7 (70 हजार रुपये), लाकडी कपाटे सात ( 1 लाख रुपये), जनरेटर ( 3 लाख रुपये) तसेच इतर साहित्य मिळून सुमारे सोळा लाख 16 लाख 62 हजार 500 रुपयांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.या कारवाईच्या वेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे या कार्यालयात उपस्थित नव्हत्या. खरमाळे या पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौºयात होत्या. यावेळी कार्यालयात नायब तहसीलदार मुसळे तसेच इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. मात्र न्यायालयाच्या आदेशास असल्याने ते ही कारवाईच्या वेळी शांत होते.सदरच्या कारवाईमुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज दिवसभर ठप्प होते. खुर्च्या नसल्याने कर्मचारी उभे होते. त्यामुळे याचा फटका सर्व येथे येणाऱ्या नागरिकांना बसला. याबाबत नायब तहसीलदार मुसळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मेहता यांच्या घरा संदर्भात आमच्याकडे जी रक्कम आली होती ती आम्ही यापूर्वी केली आहे.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ची मंजूर वाढीव रक्कम आहे ती रक्कम आम्ही कार्यकारी अभियंता महामार्ग प्रशासन यांच्याकडे मागणी केलेली आहे. मात्र ती रक्कम अद्याप आली नसल्यामुळे त्यांचे वाढीव पैसे आम्ही देऊ शकलो नाही. एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या कार्यालयातील सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असून या कारवाईमुळे सर्व प्रशासनात खळबळ उडाली आहे.