शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 2:44 PM

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !महामार्ग चौपदरीकरण काम ; धुळीचा नागरिकांना त्रास

कणकवली : मुंबई-गोवा चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांनंतर सरकारने मान्य केली आहे. कोकणातील या महामार्गासाठी सुमारे २२ हजार ६६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गाचे चित्र पालटल्याचे दृष्य सिंधुदुर्गात पहायला मिळत आहे. ठेकेदाराच्या अनास्थेमुळे चौपदरीकरणातील १४ पुलांचे काम पुन्हा फेरनिवीदा करून करण्यात येणार असल्याने काम मार्गी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम करताना इंदापूर ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले. त्या टप्प्यांमध्ये विविध १० ठेकेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या रस्त्याची ४५० किमी लांबी असून त्यासाठी शासनाने २२ हजार ६६४ कोटी निधीची तरतूद केली आहे.

इंदापूर ते वडेपाले, वीर ते भोगाव, भोगाव ते कशेडी घाट, कशेडी घाट ते परशुराम घाट, परशुराम घाट ते आरवली, आरवली ते काटे, काटे ते वाकेड, वाकेड ते तळगाव, तळगाव ते कलमठ जानवली नदीपूल, कलमठ - कणकवली ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले आहेत.१० टप्प्यांमध्ये चौपदरीकरण करत असताना कॉन्क्रीट रस्ता, मोठे तसेच लहान पूल, बस स्टॅण्ड, छोठी मोठी जंक्शन, अंडरपास, प्लायओव्हर, सर्व्हिस रोड अशी कामे अंर्तभूत करण्यात आली आहेत. त्यामुळे कोकणातील दळणवळणासाठी हा मुंबई-गोवा महामार्ग खऱ्या अर्थाने चौफेर विकासाचा मार्ग ठरेल अशी शक्यता आहे. सध्या या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे.ठिक-ठिकाणी चौपदरीकरणाचे रस्ते पुर्णत्वास जातानाचे चित्र दिसून येत आहे. कधी नव्हे ते चौपदरीकरण झाल्यानंतरचे चित्र कोकण वासियांना पाहता येत आहे़.या चौपदरीकरणाला लागून सिंधुदुर्गात नांदगाव-देवगड, कुडाळ मालवण, कणकवली-आचरा, कुडाळ-सिंधुदुर्ग असे चार रस्ते सीमेंट क्राँक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.त्यासाठी २१२० कोटींचा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.सिंधुदुर्गात मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम फार गतीने सुरू आहे. कणकवलीत जिल्ह्यातील पहिले उड्डान पुल होत असून या उड्डान पुलाचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीने हाती घेतले आहे. आतापर्यंत सात पिलर उभारण्याची प्रक्रीया पुर्ण होताना दिसुन येत आहे. दिवस रात्र चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. कणकवली शहरात हा मार्ग पुर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व्हिस रोड पूर्ण करण्यात येत आहेत.शहरातील १८०० मीटरच्या अंतरात १२०० मिटरचे सर्व्हिस मार्ग पुर्ण करण्यात आले आहेत. सर्व्हिसमार्गावर असलेल्या मातीमुळे नागरिकांना व वाहनचालकाना मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग