शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पक्षीमित्र संमेलनाला पालिका सहकार्य करणार

By admin | Published: August 10, 2015 12:43 AM

बबन साळगावकर : सावंतवाडी येथील नियोजन बैठकीत माहिती

सावंतवाडी : राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन सावंतवाडीत होत आहे. त्याला नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. इको-सेन्सिटिव्हबाबत वादविवाद होत असताना पक्षीमित्र एकत्र येऊन चर्चा करत आहेत, यात आनंद आहे. नगर पालिका उद्यानामध्ये फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी प्रयोग करत आहे, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे. सावंतवाडीत येत्या २३ व २४ जानेवारी २०१६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन नियोजनावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत नगराध्यक्ष साळगावकर यांनी उपस्थिती दर्शवून भव्यदिव्य पक्षीमित्र संमेलन भरविण्यासाठी नगरपालिका अनुदान व आवश्यक ते सहकार्य देईल, असे सांगताना गार्डनमधील विशिष्ट प्रकारची वनस्पती लावून फुलपाखरांना आकर्षित करण्याचा प्रयोग करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर यांनी पक्षीमित्र संमेलनाची रुपरेषा स्पष्ट केली. तर आभार डॉ. गणेश मर्गज यांनी मानले. नगर पालिकेच्या सहकार्याची अपेक्षा आयोजकांनी केली. या संमेलनाच्या जिल्ह्यातील पक्षांची अधिकृत सूची बनविण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यात कोणत्या भागात कोणकोणते पक्षी आहेत, त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबनिहाय करावी. यासाठी जरूर तर गुगलवर जाऊन सर्च केल्यास सूची बनविण्याची आवश्यक ती माहिती मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षांची यादी तयार करणे सोपे होईल, असे सूचविण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. धिरेंद्र होळीकर, डॉ. गणेश मर्गज, डी. के. सावंत, डॉ. दीपक तुपकर, डायमंड लोबो यांनी भाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षीमित्र संमेलन होत असल्याने मिनी पक्षीमित्र संमेलन घेऊन चळवळ जाणीवजागृती निर्माण करण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत, असे प्रा. सुभाष गोवेकर यांनी सांगितले. निसर्ग मित्रमंडळाचे सदस्यत्व मोहीम राबवितानाच या संमेलनासाठी निधी गोळा करण्याचे ठरविण्यात आले. पक्षीमित्र संमेलनात सक्रीय सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासोबतच संवर्धनाचे कामही होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पक्षीमित्रांनी जाऊन पक्षांचे निरीक्षण करावे, असे सूचविण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी १६ आॅगस्ट रोजी डेगवे, पेडवे-माजगाव भागात पक्षीमित्रांनी निरीक्षणासाठी जायचे ठरविले. त्या दिवशी सकाळी ७ वाजता स्थापेश्वर मंदिर डेगवे येथून मोहीम सुरू होईल. शक्य झाल्यास तळकट बागेपर्यंत पक्षीमित्र जातील, असे सूचविण्यात आले. डेगवेची जबाबदारी संजय देसाई व रणजीत सावंत यांनी घेतली. तर २३ आॅगस्ट रोजी माजगाव येथे पक्षीमित्रांनी सकाळी ७ वाजता फिरायचे ठरविले. त्याची जबाबदारी डी. के. सावंत यांनी घेतली. यावेळी प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. गणेश मर्गज, प्रा. धिरेंद्र होळीकर, डी. के. सावंत, डॉ. दीपक तुपकर, संजय देसाई, रणजीत सावंत, महेंद्र पटेकर, अभिमन्यू लोंढे, मिलिंद भोसले, जगदीश सावंत, महादेव भिसे, आत्माराम गवस, अतुल बोंद्रे, राधा बर्वे, प्रवीण बोरकर, डायमंड लोबो तसेच निसर्गाच्या संवर्धनाबाबतचे मान्यवर उपस्थित होेते. (प्रतिनिधी)