सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या हद्दीत आरक्षित असलेल्या जागा घेण्यासाठी जवळपास ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे जी महत्त्वाची आरक्षणे आहेत, त्यासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी सर्व नगराध्यक्षांसह नगरविकास प्रधान सचिवांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.सरकार नगरपालिकेला सातवा वित्त आयोग लागू करत असताना नगरपालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेत नाही. पगार आणि पेन्शन द्यायलाही पालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने पालिकांना अतिरिक्त मदत करण्याची गरज असल्याचीही तेली यांनी मागणी केली आहे.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, अमित परब आदी उपस्थित होते.तेली म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देवगड व वैभववाडी तालुक्यात भाजपाच्या २ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. तब्बल ६१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले.साळगावकर हे नैराश्यातून जात आहेतमाजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे नैराश्यातून जात आहेत. त्यामुळे त्यांना सावरायला वेळ दिला पाहिजे. आठ वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेल्या साळगावकर यांना ३०८ मतांवर समाधान मानावे लागते, त्यांच्यावर काय बोलावे? अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे केली.
साळगावकरांच्या राजीनाम्यामुळेच संजू परब यांना सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. त्यामुळे साळगावकर यांना शुभेच्छा, असेही तेली यांनी सांगितले.