देवगड : देवगड तालुक्यात बापार्डे बौद्धवाडी येथील भारत मुरारी सकपाळ (५०) याने दारूच्या नशेत मध्यरात्री आई व व भाऊ याचा दांड्याने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास समोर आली. आई शोभा मुरारी सकपाळ (वय-७५) व मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ (५५) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी देवगड पोलिस दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. भारत मुरारी सकपाळ (वय-५० रा. बापर्डे बौद्धवाडी) असे त्याचे नाव आहे.मिळालेली माहिती अशी की, भारत सकपाळ याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेतच त्याचा घरामध्ये आई व भाऊ यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास आई शोभा सकपाळ व मोठा भाऊ महेंद्र सपकाळ यांची झोपेत असताना दांड्याने ठेचून खून केला.दररोज सकाळी पाच वाजता उठणाऱ्या शोभा सकपाळ व त्यांच्या घरातली मंडळी अजून का उठली नाही म्हणून ग्रामस्थांनी याची माहिती गावचे सरपंच व पोलिस पाटील यांना दिली. सरपंच व पोलिस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता आई व मुलगा मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी भारत हा घरात नसल्याने त्याची शोधाशोध केली असता तो जंगलात सापडला.
यावेळी त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनीच आई व भावाचा खून केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर सरपंच व पोलिस पाटील यांनी तात्काळ ही घटना पोलिसांना कळविली त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अन् संशयित भारत सकपाळ याला ताब्यात घेतले.२००७ मध्ये पत्नीचा केला होता खूनभारतने यापूर्वीही दारूच्या नशेत २००७ साली पत्नीचा हेल्मेटच्या साहाय्याने खून केला होता. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. पत्नीचा खून केल्यानंतर त्याची मुले दोन्ही मुलं आजोळी आपल्या मामाकडे राहत असल्याची माहिती मिळाली.