शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

आचरेकर प्रतिष्ठानतर्फे कणकवलीत ९ फेब्रुवारी पासून संगीत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 2:55 PM

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या २१ व्या संगीत महोत्सवाची रुपरेषा जाहीर झाली आहे. ९ते १० फेब्रुवारी या कालावधीत येथील प्रतिष्ठानच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांचे गायन आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीत ९फेब्रुवारी पासून संगीत महोत्सवआचरेकर प्रतिष्ठानचे आयोजन, शौनक अभिषेकी यांचे गायन

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या २१ व्या संगीत महोत्सवाची रुपरेषा जाहीर झाली आहे. ९ते १० फेब्रुवारी या कालावधीत येथील प्रतिष्ठानच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांचे गायन आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे.

पं. शौनक अभिषेकी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने कोकणातील संगीत रसिकांची अभिजात संगीताची आवड जोपासली जावी यासाठी २१ वर्षांपूर्वी संगीत महोत्सवाला प्रारंभ केला. दरवर्षी दिग्गज कलाकारांच्या मैफली आयोजित करून हा महोत्सव दरवर्षी गुणात्मक दृष्ट्या उंचावत नेला.याहीवर्षी हा संगीत महोत्सव दिमाखदारपणे होणार आहे. शनिवार ९ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, पं.जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राचे गुरु समीर दुबळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

सुधीर नायक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर सुधीर नायक यांची हार्मोनियम कार्यशाळा होणार आहे. रविवार १० फेब्रुवारी रोजी 'भैरवी दर्शन' हा कार्यक्रम होणार असून यात वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थेच्या पं.जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्रातील पं.समीर दुबळे यांचे विद्यार्थी ईश्वरी तेजम, मनोज मेस्त्री, विश्रांती कोयंडे, डॉ. समीर नवरे, मृदुला तांबे, उमेश परब, नीलेश धाक्रस आदींचे गायन आयोजित करण्यात आले असून यावेळी पं. दुबळे हे हेही आपले गायन सादर करणार आहेत.

अनुजा झोकरकरत्यांनतर पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात अनुजा झोकरकर आणि ईश्वरी तेजम यांचे गायन तर सुधीर नायक यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे. त्यानंतर पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे.

या संगीत संमेलनाला माधव गावकर यांची संवादिनी साथ तर चारुदत्त फडके, प्रसाद करंबेळकर यांची तबलासाथ लाभणार आहे. संगीत रसिकांनी आचरेकर प्रतिष्ठानच्या या संगीत महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड.एन.आर.देसाई व कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग