शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

माझे सावरकर यांच्याबद्दल गैरसमज संपले, मी आता त्यांचा अनुयायी- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 8:19 PM

कणकवलीत वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

कणकवली:  माझे यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल काही गैरसमज होते.तसे ट्विटही त्यावेळी मी केले होते. माझे काही राजकीय विरोधक त्याची चर्चा आता करत आहेत. पण मला सावरकर यांच्याबद्दल त्यावेळी चुकीची माहिती काहींनी दिल्यामुळे, गैरसमज निर्माण झाला होता. आता सावरकरांचे कार्य मी जाणून घेतले असून यापुढे विर सावरकर यांचा मी अनुयायी म्हणून काम करणार आहे.त्यांचे कार्य पुढील पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सावरकर गौरव यात्रा समारोप प्रसंगी ते बोलत होते.या गौरव यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,प्रमोद रावराणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,शहराध्यक्ष अण्णा कोदे,शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश सावंत-पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर,दामोदर सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,राजश्री धुमाळे,मनोज रावराणे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सुरेश सावंत,डॉ.मिलिंद कुलकर्णी , भालचंद्र साठे,युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री,तालुका सरचिटणीस महेश गुरव ,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई,वैभववाडी नगराध्यक्षा स्नेहा माईणकर,तालुकाध्यक्ष नासीर काझी ,राजन चिके,संजना सदडेकर,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे, हर्षदा वाळके,बाळ खडपे,संदीप साटम ,प्राची तावडे,देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,अमोल तेली ,योगेश चांदोसकर,रवी पाळेकर,प्रणाली माने आदीसह भाजपा व शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार नितेश राणे म्हणाले,स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफी वीर म्हणणे चुकीचे आहे.राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यानंतर सावरकरांचे विचार व कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी  भाजपा नेत्यांनी विधानसभा मतदार संघ निहाय सावरकर गौरव यात्रा काढण्याचे निश्चित केले.त्यानुसार काढलेल्या या यात्रेत कणकवलीत मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी सहभागी झाले आहेत. यापूर्वी तत्कालीन सरकार विरोधात आम्ही आंदोलन केल्यामुळे अनेकदा आम्हाला तुरुंगात टाकण्यात आले आहे.आम्हाला ६ तास तुरुंगात राहताना कठीण होत होते.मात्र, वीर सावरकर यांनी आपल्या जीवनात भोगलेला तुरुंगवास आणि त्यांनी निर्माण केलेले आदर्श आम्ही विसरु शकणार नाही. देशासाठी त्यांनी  जे योगदान दिले ते अतुलनीय आहे.  वीर सावरकर यांना राहुल गांधी यांनी माफी वीर म्हणणे चुकीचे आहे.त्यांनी किमान स्वतःच्या आजीने सावरकर यांच्याबाबत काय म्हटले होते ?  ते वाचायला पाहिजे होते.त्यानंतर राहुल गांधी तसे केव्हाच म्हणणार नाहीत. राहुल गांधींनी तुरुंगवारी टाळण्यासाठी यापूर्वी माफी मागितली होती. त्याची आठवणही ठेवावी.असेही ते म्हणाले.

संजय आंग्रे म्हणाले,शिंदे-फडणवीस सरकारने हिंदू काय आहे ? हे आज या यात्रेतून दाखवून दिले आहे.सावरकर यांची ही गौरव यात्रा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले,ब्रिटिशांनी सावरकर यांना कठोर शिक्षा सुनावली. देशप्रेमामुळे ती शिक्षा त्यांनी भोगली. त्यांच्या कर्तुत्वाला ही यात्रा काढत न्याय देण्याचा प्रयत्न आमदार नितेश राणे यांनी केला.हिंदुत्वाचा मुद्दा जिथे जिथे आला तिथे आमदार राणे धावले आहेत.सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी दिलेले सल्ले सर्वच खरे ठरले आहेत.त्यांचे कार्य  समजून घेऊन त्यांचे विचार  आत्मसात केले पाहिजेत.

यावेळी वीर सावरकर लिखित बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा या यात्रेच्या प्रारंभी सादर करण्यात आला.कणकवली पटकी देवी मंदिर येथून 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला' प्रारंभ झाला.  रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत  होते. जय श्रीराम, मी सावरकर अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या जात होत्या.'मी सावरकर' असे लिहलेल्या टोप्या, शाली यात्रेत सहभागी लोकानी परिधान केल्या होत्या.त्यामुळे  शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Kankavliकणकवली