वैभववाडी (सिंधुदुर्ग) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने ९ जागा जिंकून सत्ता राखली आहे. तर शिवसेनेच्या पदरात ५ जागा पडल्या असून तीन अपक्षांमध्ये एक भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आला आहे.पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर लढतीचे चित्र होते. त्यामध्ये भाजपने १३ पैकी ७ जागांवर वर्चस्व राखत सत्तेच्या चाव्या हाती ठेवण्यात यश मिळवले. तर शिवसेनेला ४ व दोन अपक्षांना लाॅटरी लागली. दुस-या टप्प्यात झालेल्या चार जागांपैकी भाजप- २ शिवसेना- १ व अपक्ष निवडून आले आहेत. नगरपंचायतीत १७ पैकी भाजप-९, शिवसेना- ५, अपक्ष-२ व भाजप पुरस्कृत अपक्ष- १ असे पक्षीय बलाबल आहे.माजी नगराध्यक्ष : एक विजयी; एक पराभूतया निवडणुकीत माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण प्रभाग ८ मध्ये शिवसेनेतून आणि अक्षता जैतापकर प्रभाग ४ मधून अपक्ष लढले. त्यांच्यापैकी अपक्ष जैतापकर यांनी विजयश्री खेचून आणली. तर चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले.पती-पत्नी झाले नगरसेवकमाजी नगरसेविका सुप्रिया राजन तांबे आणि त्यांचे पती राजन वसंत तांबे ही दोघंही भाजपचे उमेदवार होती. सुप्रिया तांबे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवारावर एका मताने मात करुन विजयी ठरल्या. तर राजन तांबे हे सुद्धा निवडून आले आहेत.
वैभववाडी नगरपंचायतीत भाजपने सत्ता राखली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 4:08 PM