शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

डंपर व्यावसायिकांकडून नायब तहसीलदार, तलाठ्यांना मारहाण, सिंधुदुर्गातील कुडाळमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 4:05 PM

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हे दाखल

कुडाळ : अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना रोखून त्यांना वाहतुकीसंदर्भातील पास विचारले असता, या अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी कुडाळ तहसील कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभिजीत हजारे व आंब्रड तलाठी नवीन राठोड यांना कुडाळ येथील औदुंबरनगर येथे मारहाण केली. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सध्या अनधिकृत वाळू उपसा व या वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या अनुषंगाने कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके नेमली आहेत. यामधील १ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाचे प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभिजीत हजारे व आंब्रड येथील तलाठी नवीन राठोड यांची नेमणूक केली होती.या पथकाने खासगी चारचाकी गाडीच्या माध्यमातून सोनवडे येथे नदीकिनारी वाळू उपसा होत आहे की नाही, याची पाहणी केली ही पाहणी केल्यानंतर ते कुडाळच्या दिशेने येत असताना त्यांना कुडाळ केळबाईवाडी येथील स्मशानभूमीच्याजवळ एका डंपरमधून पाणी रस्त्यावर पाजरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन या डंपर आला थांबवले. हा डंपर थांबवल्यानंतर मागवून येणारे डंपर त्या ठिकाणी थांबले. त्यांच्याजवळ पासची मागणी केली असता कोणत्याही वाहतुकीचे पास या डंपर व्यवसायिकांकडे नव्हते. यामध्ये डंपर व्यावसायिक व महसूलच्या या पथकामध्ये बाचाबाची झाली.या डंपरवर कारवाई होणार हे लक्षात आल्यावर प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार अभिजीत हजारे व तलाठी नवीन राठोड यांना व्यावसायिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तलाठी नवीन राठोड यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला. ही घटना समजल्यानंतर कुडाळ पोलीस ठाणे येथे तहसीलदार अमोल पाठक व तलाठी सोनावणे दाखल झाले. या मारहाण करणाऱ्या वाळू व डंपर व्यावसायिकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई सुरू राहणारअनधिकृत गौण खनिज उत्खनन व अनधिकृत गौण खनिज वाहतूक होत असेल तर कारवाई करण्यात येईल. तसेच यावेळी कोणी ही दमदाटी किंवा इतर अडथळा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करू, अशी प्रतिक्रिया तहसीलदार अमोल पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, तहसीलदार रात्री उशिरापर्यंत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना उपस्थित होते.मारहाण करणाऱ्यांवर झाले गुन्हे दाखलविविध कलमांन्वये अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर,  अमोल ठाकूर,  अंकित नाईक, स्नेहांकित बांदेकर, वैभव देसाई, जागृत परब, साई अणावकर यांच्यासह अनोळखी चार ते पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या डंपरचा समावेशज्या डंपरमधून अनधिकृत वाळू वाहतूक होत होती आणि हे डंपर अडवण्यात आले होते. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर या डंपरांचे पलायन करण्यात आले. यामध्ये (एमएच- ४३ वाय- ४५०१), (एमएच- ०७ सी- ५२४२), (एमएच ०७ एजे- ६०७३),  (एमएच- ०७ एक्स - ०५८८) या डंपरांचा समावेश होता. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस