ऑनलाइन लोकमतसिंधुदुर्ग, दि. 26 - सावंतवाडीजवळ गुबेरनॅटोरिआना ठाकरे आणि इतर चार खेकड्यांच्या प्रजाती तेजस यांनी शोधून काढल्या होत्या. या प्रजातींचा अधिक अभ्यास करण्यासाठी तेजस ठाकरेंनी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. तेजस उद्धव ठाकरे यांनी शोधलेल्या खेकड्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना राज्य सरकारनं परवानगी दिलीय. सावंतवाडीजवळ गुबेरनॅटोरिआना ठाकरे आणि इतर चार खेकड्यांच्या प्रजाती तेजस यांनी शोधून काढल्या होत्या. या प्रजातींचा अधिक अभ्यास करण्यासाठी तेजस ठाकरेंनी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. नियमानुसार, वन्य जीवांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार, वन्यजीव संरक्षण मंडळाकडे तेजस यांनी परवानगी मागितली होती. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या समितीनं तेजस ठाकरेंना ही परवानगी दिलीय. अर्थात, काही अटी घालून राज्य सरकारनं ही परवानगी दिलीय. या परवानगीमुळे ज्या खेकड्यांच्या प्रजाती दुर्मिळ झाल्या त्यांचा अभ्यास तेजस ठाकरे करू शकणार आहेत. खेकड्यांच्या प्रजाती, अन्नश्रृंखला, ते दुर्मिळ का झाले अशा विषयांवर ते सखोल अभ्यास करणार आहेत. तेजस हा उद्धव ठाकरेंचा छोटा मुलगा आहे.
खेकड्याच्या नव्या प्रजातीला ठाकरेंचं नाव
By admin | Published: October 26, 2016 10:51 PM