सावंतवाडी : येथील शहरासाठी काही न केलेल्या दीपक केसरकर यांना येथील लोक वारंवार का निवडून देतात, असा प्रश्न करणाऱ्या नारायण राणे यांच्यासह त्यांच्या पुत्राला येथील जनतेने वारंवार का डावलले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिला.
या शहरात जन्म झालेल्या शिवसेनेचा उमेदवार बाबू कुडतरकर यांच्या विरोधात बाहेरचा उमेदवार दिला. भाजपकडे सक्षम उमेदवार नाही होता का? अशी टिकाही त्यांनी संजू परब यांच्यावर केली आहे.मंगळवारी येथील माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी डॉ. परुळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उमेदवार बाबू कुडतरकर, अण्णा केसरकर, राजन पोकळे, अनारोजीन लोबो, उमाकांत वारंग, शब्बीर मणियार, उमेश कोरगांवकर आदी उपस्थित होते.परुळेकर म्हणाले, खासदार राणे यांनी सावंतवाडीत येऊन दीपक केसरकर यांच्यावर केलेली टीका म्हणजे तो सावंतवाडीकराचा अपमान आहे. ह्यकेसरकरांना सावंतवाडीकर पुन्हा पुन्हा निवडून का देतात?ह्ण या म्हणण्याचा अर्थ म्हणजे सावंतवाडीकरांना अक्कल नाही असाच होतो. त्यामुळे स्वत: राज्यसभेत मागच्या दरवाजाने गेलेल्या राणेंना व त्यांच्या पुत्राला जनतेने वारंवार का डावलले, याचा विचार त्यांनी करावा.केसरकर यांनी सावंतवाडी तालुक्यासह येथील शहराला दिलेला निधी व कामे जनतेसमोर आहे. काही कामे सुरू आहेत तर काही कामे मंजूर आहेत. शिवाय २०-२५ वर्षांपूर्वी केसरकर यांनी जे प्रकल्प राबविले त्यांचे नूतनीकरणही आज सुरू आहे. यात रघुनाथ मार्केट, शिल्पग्राम, हेल्थफार्म यासाठी तीन कोटी रुपये मंजूर आहेत.आरोग्याच्या दृष्टीने डायलेसिस मशीन येथे मंजूर आहे. नरेंद्र्र डोंगराच्या पायथ्याशी योगा सेंटर सुरू करणार आहेत. मोनोरेलचे काम सुरू आहे. सावंतवाडीत अत्याधुनिक एसटी डेपो होत आहे. अशी अनेक कामे या शहरात सुरू असून, अनेक कामे होऊ घातली आहेत. पण नारायण राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. म्हणून ते आज काहीही बोलत आहेत. शिवसेनेवर केलेली टीकाही अशीच आहे. ठाकरे कुटुंबीय जे बोलतात ते करून दाखवितात. त्यामुळे सद्यस्थितीत नारायण राणेंनाच काय, अख्ख्या भाजपालाच वैफल्य आले आहे.परुळेकर पुढे म्हणाले, सावंतवाडीचा इतिहास, येथील संस्कृतीची माहिती नसलेला आणि दोनच महिन्यांपूर्वी इथल्या मतदार यादीत नाव सामाविष्ट केलेल्या उमेदवारापेक्षा शिवसेनेने दिलेला उमेदवार या शहरात वाढलेला, इथल्या संस्कृतीत जडणघडण झालेला आहे. त्यामुळे संजू परब यांनी आधी टर्मिनसबाबत आपली भूमिका काय होती, ती आधी जाहीर कारावी.भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावललेअण्णा केसरकर यांनीही टिका करताना, फक्त पैसे आहेत म्हणून एखाद्या मंडळाला द्यायचे व मला निवडून द्या म्हणून सांगायचे या वृत्तीचा शिवसेनेचा उमेदवार नाही. आज भाजपामध्येच नवा-जुना वाद उफळला असून जुन्या कार्यकर्त्यांना डावलून काल-परवा आलेल्यांना भाजपाने तिकीट दिले. त्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज असून नव्यांना धडा शिकविण्याच्या तयारीत ते आहेत.