Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. यात्रेच्या समारोपावेळी नारायण राणे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या. "बाळासाहेब आज जर असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मी नक्कीच 'मातोश्री'वर त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो असतो", असं नारायण राणे म्हणाले.
'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा
जनआशीर्वाद यात्रेला कोकण वासियांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल राणेंनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले. यासोबतच शिवसेनेवरही हल्लाबोल केला. कोकण शिवसेनेचा गड होता हा आता तो इतिहास झाला आहे. कोकणच्या विकासासाठी काम करत राहणं हे माझं काम आहे आणि कोकणवासियांनी आजवर केलेल्या प्रेमाबाबत मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहणार आहे, असं राणे म्हणाले.
'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार
मंत्रीपद मिळाल्यानंतर बाळासाहेबांची आठवण झाल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. "बाळासाहेबांना माझ्या आयुष्यात वेगळं स्थान आहे आणि ते आजही कायम आहे. शिवसेना सोडल्यानंतरही माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं व्हायचं. त्यांनी माझ्यावर टीका केली असली तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठिशी होते. म्हणून मी मंत्री झाल्यानंतर मुंबईत आल्यावर शिवाजी पार्कवर गेलो. त्यांच्या स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झालो. बाळासाहेब आज असते तर नक्कीच 'मातोश्री'वर गेलो असतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले असते", असं नारायण राणे म्हणाले.