शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ठरलं! नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:57 PM

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सिंधुदुर्गः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार नितेश राणे यांनी राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिला आहे. चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता राणेंचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असून, त्यानंतर ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपामध्ये विलीन करणार आहेत. मी भाजपामध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केला होता. पुढे ते म्हणाले होते की, माझा भाजप प्रवेश आणि मंत्रिपदही ठरले होते. मात्र शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र मी जाणार हे पक्के असल्याचेही स्पष्ट संकेत त्यावेळी राणेंनी दिले होते. दोन वर्षांपूर्वी राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या पक्षाने केंद्रातील एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर राणेंना भाजपने राज्यसभेवर खासदार केले. म्हणजे दोन वर्षांपूर्वीपासून राणे भाजपामध्ये येण्यासाठी इच्छुक होते. मात्र, राणेंना भाजपामध्ये घेण्यासाठी शिवसेनेने विरोध केल्यामुळे राणेंचा भाजपा प्रवेश रखडला होता. राणेंना थेट भाजपा प्रवेश न मिळाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना तोपर्यंत स्वतंत्र पक्ष काढण्याची संकल्पना दिली असावी. त्यातून राणेंनी पक्ष स्थापन केला. राणेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण करण्याची संकल्पना ही बहुधा त्यावेळीच ठरली असावी, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात कमालीचे बदल झाले आहेत. त्यापूर्वी 25 ते 30 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर ठरणाऱ्या नारायण राणे यांना कुडाळ-मालवण मतदार संघातून पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. शिवसेनेने 2004नंतर 10 वर्षांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात तीनपैकी दोन जागा मिळवून आपला भगवा फडकविला होता. नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत 2005मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढील 9 वर्षे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. मात्र, 2014च्या निवडणुकीत केवळ कणकवली विधानसभा मतदारसंघ तेवढा काँग्रेसकडे राहिला आणि उर्वरित कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन्ही मतदारसंघ सेनेने पुन्हा मिळविले. त्यामुळे राणेंनी एकेकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा उभारी मिळण्यासाठी तब्बल 9 वर्षे संघर्ष करावा लागला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019