शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नार्वेकरांच्या गुगलीने अनेक जण क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:46 AM

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी बोलण्याच्या ओघात मी नगरपालिका निवडणुकीत बबन साळगावकर यांनाच शुभेच्छा दिल्या होत्या

सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी बोलण्याच्या ओघात मी नगरपालिका निवडणुकीत बबन साळगावकर यांनाच शुभेच्छा दिल्या होत्या, असे सांगत अप्रत्यक्षरित्या त्या निवडणुकीत साळगावकर यांनाच मदत केल्याचे स्पष्ट केले. पण तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होता, याची आठवण करून देताच त्यांनी वयाप्रमाणे असे होते, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.अ‍ॅड. नार्वेकर यांनी बबन आमदार झाल्यास त्याचे कान धरण्याचा मला अधिकार असल्याचेही यावेळी नमूद केले. भाईसाहेब आयुर्वेद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी राजेशकुमार गुप्ता हे निवृत्त होत असल्याने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी येथील नगरपालिका कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर आदी उपस्थित होते.अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी दहा वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नगरपालिका निवडणुकांसाठी तिकिटांचे वाटप केले होते. त्यावेळी कणकवलीतून सावंतवाडीत तिकिटाचे वाटप करण्याबाबत आलेल्या उमेदवारांच्या यादीत आपण कसा व्हाईटनर लावला त्यापासून गुप्ता यांच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी माजी नारायण राणेच का, या सर्व प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी काही प्रश्नांसाठी त्यांनी साक्षीला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनाही ठेवले. पण रोजगारांच्या मुद्द्यावर नार्वेकर व साळगावकर यांची भूमिका एक वाटली. सर्वच प्रकल्पांना विरोध केला तर रोजगार कसा येईल, असा सवाल अ‍ॅड. नार्वेकर यांनीही यावेळी केला.तर प्रमुख मुद्दा ठरला तो नगरपालिका निवडणुकीतील दीड वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांना डावलून काँग्रेसने संदीप कुडतरकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत आपण बबन साळगावकर यांना शुभेच्छा दिल्या होत्या, असे सांगत एक प्रकारे मी साळगावकर यांचाच प्रचार केल्याचे स्पष्ट केले. पण जेव्हा तुम्ही हा गौप्यस्फोट करता आहात असे सांगितले, तेव्हा त्यांनी आता वय झाले ना, त्यामुळे होते केव्हा तरी, असे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.तर आयुर्वेदिक हॉस्पिटलचे प्रश्न कोण सोडवणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. तर आपण कशा प्रकारे आयुर्वेदिक रुग्णालय चालवत आहे, याची माहितीही त्यांनी दिली. बबन साळगावकर हे आमदार झाल्यास मला त्याचा कान धरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे ही यावेळी अ‍ॅड. नार्वेकर यांनी नमूद केले. ही राजकीय जुगलबंदी तब्बल अर्धा तास चालली होती. यावेळी अनेक विषयांवरून सर्व नगरसेवकांनी कोटी करण्याचा प्रयत्न केला.