शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

Sindhudurg- नाटळ ग्रामसभा मारहाण प्रकरण: माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन सावंत यांना सशर्थ जामीन मंजूर

By सुधीर राणे | Published: August 19, 2024 5:01 PM

कणकवली:  तालुक्यातील नाटळ येथील ग्रामसभा चालू असताना पुर्ववैमनश्यातून तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला. ...

कणकवली:  तालुक्यातील नाटळ येथील ग्रामसभा चालू असताना पुर्ववैमनश्यातून तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला. तसेच किशोर परब, महेंद्र गुडेकर यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पांडुरंग सावंत याची २५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश अतिरीक्त सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी दिले आहेत. ३ जून २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता नाटळ ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्ती अध्यक्ष गणेश सावंत हा आपण दिलेल्या पत्रावर तत्काळ उत्तर द्या, असे बोलून तो सरपंच सुनील घाडीगावकर यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी तक्रारदार दिनानाथ सावंत हे अडवायला गेले. तेव्हा गणेश याने आणलेल्या  धारधार चाकूने तक्रारदाराच्या डोक्यावर गंभीर वार केले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या अभिषण सावंत, पद्माकर पांगम, पंढरी पांगम, प्रदीप सावंत यांनी तक्रारदाराला लाथाबुक्क्याने मारहाण केली. साक्षीदार किशोर परब व महेंद्र गुडेकर हे तक्रारदाराला सोडविण्यासाठी गेले असता रमाकांत घाडीगांवकर, सचिन सावंत, सुनिल जाधव, संजय सावंत, रमेश नाटळकर, अविनाश सावंत यांनी त्याना लाथाबुक्क्याने व प्लास्टिक खुर्च्यांनी मारहाण केली. त्यानुसार १३ आरोपीविरूद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यापूर्वी दोन वेळा संबधित आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नामंजूर केलेला होता. याप्रकरणी सचिन सावंत याच्यावतीने दाखल केलेल्या जामिन अर्जावर वकिलानी  केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीची २५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर सशर्थ  मुक्तता करताना, साक्षीदारांवर  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाब आणू नये. अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासात सहकार्य करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.आरोपीच्यावतीने ॲड.  उमेश सावंत यांनी काम पाहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतCourtन्यायालय