कुडाळ : लोकशाहीचा नम्र सेवक, जनतेचा सहृदयी कैवारी म्हणजे बॅ. नाथ पै. आजच्या तरुण पिढीने त्यांचे नुसते जीवन चरित्र वाचले तरी त्यातून त्यांना मार्गदर्शक ठरतील अशा विचारांचा खजिना त्यांना मिळेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. बॅ. नाथ पै शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित नाथ पै यांची ५०वी पुण्यतिथी आणि संस्था वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नाथ पै पुण्यतिथी व संस्था स्थापना दिन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, बॅ. नाथ पै यांची नात आदिती पै व कुटुंबातील मंडळी शैलेश पै, अद्वैत पै, मीना पै, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, कमलताई परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, ॲड. देवदत्त परूळेकर, मंगल परुळेकर, सुधाकर तांडेल, जयप्रकाश चमणकर, दीपक नाईक, संजय वेतुरेकर, उमेश गाळवणकर, अरुण मर्गज, परेश धावडे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी खासदार राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नाथ पै यांचे नाव असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात, हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या नावाला साजेसे आपले भविष्यातले कार्य-कर्तृत्व दिसू द्या असे सांगत विविध शाखा-अभ्यासक्रमांनी बहरत असलेल्या या संस्थेच्या वाटचालीस व अध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कमलताई परुळेकर, जयप्रकाश चमणकर, देवदत्त परूळेकर, आदिती पै, संजय वेतुरेकर, ज्येष्ठ पत्रकार चंदू सामंत यांनीही विचार मांडले.यावेळी संस्थेचे सल्लागार डॉ. व्यंकटेश भंडारी, पीयूषा प्रभूतेंडुलकर, पल्लवी कामत, विकास कुडाळकर यांच्यासह विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन भावना प्रभू, ऋचा कशाळीकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी तर उपस्थितांचे आभार प्रणाली मयेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कर्तृत्वाने आदरास पात्रआमदार वैभव नाईक म्हणाले, बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव ८० वर्षांनंतरही समाजात आदराने घेतले जाते. त्यांच्या कार्याचे आज स्मरण केले जाते ही खऱ्या अर्थाने त्यांच्या महानपणाची पोचपावती आहे. आपल्या मातीत जन्मलेला माणूस जगभरामध्ये आपल्या कर्तृत्वाने आदरास पात्र झालेला आहे. त्या अमोल देणगीचे, त्यांच्या विचारांचे आपण जतन करूया आणि हे जतन करण्याचे कार्य संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व त्यांचे सहकारी करीत आहेत त्यांना आपण बळ देऊया, असे आवाहनही त्यांनी केले.
नाथ पैंचे विचार तरुणांना मार्गदर्शक :विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:42 PM
Vinayak Raut sindhudurg- लोकशाहीचा नम्र सेवक, जनतेचा सहृदयी कैवारी म्हणजे बॅ. नाथ पै. आजच्या तरुण पिढीने त्यांचे नुसते जीवन चरित्र वाचले तरी त्यातून त्यांना मार्गदर्शक ठरतील अशा विचारांचा खजिना त्यांना मिळेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. बॅ. नाथ पै शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित नाथ पै यांची ५०वी पुण्यतिथी आणि संस्था वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
ठळक मुद्दे नाथ पैंचे विचार तरुणांना मार्गदर्शक :विनायक राऊत कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा स्थापना दिवस साजरा