रत्नागिरी : पालीसारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या अनुजा सावंत हिची जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शाळेतून योगायोगाने निवड करण्यात आली. इयत्ता नववीत असताना जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती पहिल्यांदा सहभागी झाली. शाळेत सराव करून घेण्यात आला होता. तरीही सुरुवातीला फारच भीती वाटली. वजन उचलताना हृदय धडधडत होतं. मात्र, नंतर काहीच वाटलं नाही. त्यानंतर अवघ्या दोन वर्षात अनुजाने विविध स्पर्धांतून सहभागी होण्याचा धडाका लावला. आतापर्यंत शालेय, सबज्युनिअर, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली विजयी पताका फडकवली आहे.स्पर्धा कोणतीही असो, खेळाचे तंत्र, कौशल्य अवगत होणे आवश्यक आहे. त्यामुळे तिने वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगसाठी प्रशिक्षणवर्ग सुरू केला. अनुजा सध्या पाली येथे अकरावी कला शाखेत शिकत आहे. सकाळी कॉलेजनंतर अनुजा रत्नागिरीत पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंगच्या सरावासाठी येते. सकाळी तीन तास आणि सायंकाळी चार तास ती न चुकता सराव करते. रविवारी सुटी असते. परंतु स्पर्धेच्या कालावधीत सुटीच्या दिवशीही तिचा सराव सुरू असतो. सरावाबरोबर डायटकडे प्राधान्याने लक्ष देत असल्याचे अनुजाने यावेळी बोलताना सांगितले. आई - बाबा, काका - काकी व भावंडे अशा एकत्रित कुटुंबातील अनुजाला घरातून खेळाचे कोणतेही बाळकडू प्राप्त झालेले नाही. परंतु प्रोत्साहन मात्र भरपूर मिळत आहे. घरच्याचा भक्कम पाठिंबा व विश्वास यामुळेच मी यश संपादन केले आहे. यापुढे खेळ सुरू ठेवणार असून, कॉमनवेल्थ खेळण्याबरोबर महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळवण्याचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. रत्नागिरीत सकाळच्या सत्रातील सराव आटोपल्यावर संध्याकाळच्या सरावापूर्वी मोकळ्या असलेल्या वेळेचा सदुपयोग अभ्यासासाठी करीत असल्याचे सांगितले. घरी पोहोचण्यासाठी तिला रात्र होते. मात्र, तरीही न कंटाळता सकाळी उठून कॉलेज करून सरावासाठी नेहमी हजर असते. बारावीनंतर पुढे कॉलेज करणार आहेच, परंतु स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रीत करून भविष्यात आयएएस अधिकारी होण्याची इच्छा असल्याचेही अनुजाने सांगितले. प्रशिक्षक संजय झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू आहे.राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यशराष्ट्रीय सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक.राष्ट्रीय ज्युनिअर पॉवरलिफ्टर्स फेडरेशन स्पर्धेत सुवर्णपदक.राष्ट्रीय सिनिअर पॉवरलिफ्टर्स स्पर्धेत रौप्यपदक.राष्ट्रीय सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.राष्ट्रीय वेटलिफ्टिंग पायका ग्रामीण स्पर्धेत कांस्यपदक.राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग पायका ग्रामीण स्पर्धेत सुवर्णपदक.४शालेय राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यशराज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक.राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पर्धेत चार सुवर्णपदके.सिनिअर बेंचप्रेस ओपन गटात रौप्यपदक.शालेय राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.बृहन्मुंबई महापौर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कास्यंपदक.कल्याण-डोंबिवली महापौर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.
राष्ट्रीय स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये अनुजाची पताका--यश रत्नकन्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2016 12:01 AM