कणकवली तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:20 IST2020-12-03T17:16:44+5:302020-12-03T17:20:11+5:30
Congress, Farmer strike, Kankavli, sindhudurg केंद्रसरकारने तीन कृषी कायदे लादले असून ते अन्यायकारक आहेत. असा आरोप करीत त्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय काँग्रेस कणकवलीच्यावतीने तहसीलदार कार्यालया बाहेर गुरुवारी धरणे अंदोलन छेडण्यात आले.

कणकवली तहसिदार आर.जे.पवार यांना काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी निवेदन दिले. यावेळी नागेश मोर्ये, एम.एम.सावंत,प्रवीण वरुणकर,बी.के.तांबे आदी उपस्थित होते.
कणकवली : केंद्रसरकारने तीन कृषी कायदे लादले असून ते अन्यायकारक आहेत. असा आरोप करीत त्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय काँग्रेसकणकवलीच्यावतीने तहसीलदार कार्यालया बाहेर गुरुवारी धरणे अंदोलन छेडण्यात आले.
काँग्रेस कडून अन्यायकारक कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा. अशी मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी याावेळी सुपूर्द केले.
यावेळी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये,सरचिटणीस एम.एम.सावंत,प्रवीण वरुणकर,माजी तालुकाध्यक्ष बी.के.तांबे,प्रदीप तळगावकर,डॉ.प्रमोद घाडीगावकर,संदीप कदम,विजय कदम,प्रदीपकुमार जाधव,महेश तेली आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आहे.