शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

निसर्ग साक्षरता चळवळीची गरज

By admin | Published: January 19, 2016 12:03 AM

राजेंद्रसिंह : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे जलचेतना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : कोकणातील निसर्ग सुखी व समृध्द होण्यासाठी निसर्ग साक्षरतेची चळवळ उभी करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या युवापिढीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रॅमन मॅगासेसे व जलक्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले आहे.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृह येथे आयोजित जलचेतना मार्गदर्शन मेळाव्यात डॉ. राजेंद्रसिंह हे बोलत होते. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, स्वामी जयमृत्युंजय, जयपूर विद्यापीठाचे कुलगुरू ए. डी. सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.२१ व्या शतकामध्ये जल, वायू परिवर्तन सुरू आहे. कोकण तर भारताचा स्वर्ग आहे. येथील लोक, सुंदर पर्वत, हिरवेगार जंगल, डोंगरावरील सुंदर घरे यामुळे कोकण हे नंदनवन आहे. ४ मीटर पाऊस याठिकाणी पडतो, तरीही पाण्याबाबत दुर्भिक्ष आढळते. गेल्या दोनशे वर्षाचा इतिहास पाहिला तर धरणीमातेच्या वरच्या भागाबाबत संशोधन झाले. मात्र, धरती हिरवीगार राहण्यासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे जर ठोस उपाययोजना झाली नाही तर या भविष्यात स्वर्गाचे नरकात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असेही राजेंद्रसिंह यांनी सांगितले.नद्या गाळांनी भरल्या आहेत. शिवाय शहरातील मैला नदी, नाल्यांतून सोडण्यात आल्याने प्रदूषित झाल्या आहेत. विहिरींची पातळी खालावली आहे. राजस्थानमध्ये गेली ३१ वर्षे अव्याहतपणे काम केल्यामुळेच तेथे नद्या वाहू लागल्या आहेत, विहीरीतील पाण्याची पातळी वाढली आहे. भविष्यात याच प्रयत्नामुळे राजस्थानदेखील सह्याद्री बनेल, असेही डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले. त्यासाठी राजकीय नेते मडळींनीही सहकार्य केले पाहिजे, असे सांगितले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. कोकण भूमि प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव यांनी कोकणातील प्रत्येक महाविद्यालयाने एक नदी दत्तक घेतली पाहिजे, असे सांगितले. जलसाक्षरतेसाठी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे किशोर धारिया यांनी सांगितले. सोसायटी कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी १५० इंच पाऊस पडूनही कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, हे टाळण्यासाठी चळवळ उभारण्याची आवश्यकता स्पष्ट केली. प्रा. महेश नाईक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)राजस्थानात ३१ वर्ष : महाविद्यालयाचे कौतुकराजस्थानमध्ये ३१ वर्षापासून अव्याहतपणे काम केल्यामुळेच आता त्याठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नद्या खळखळून वाहू लागल्या आहेत, हिरवीगार शेती शिवारात डोलू लागली आहे. ढग बरसू लागले आहेत. मात्र, माझ्यासह हजारो मंडळींनी त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. स्लाईड शोद्वारे त्यांनी १५ वषापूर्वीचा राजस्थान व आजचा राजस्थान यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला. महाविद्यालयाच्या गेले १६ वर्षे गोळप येथे सुरू असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.जलचेतना मार्गदर्शनजयपूर विद्यापीठाचे कुलगुरू ए. डी. सावंत यांच्या ‘कोकणातील बेदखल कुळांचे प्रश्न’ विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.