शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सावंतवाडीत १३ पासून नाट्यमहोत्सव

By admin | Published: February 07, 2016 9:11 PM

दिनकर धारणकर स्मृती : नगरपालिकेचा पुढाकार

सावंतवाडी : सावंतवाडी येथे स्व. दिनकर धारणकर यांच्या स्मृती जपण्यासाठी नाट्यमहोत्सव २०१६ चे आयोजन केले आहे. दि. १३ ते १५ दरम्यान तीन दिवस हा महोत्सव येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. सावंतवाडीतील बॅ. नाथ पै सभागृहाच्या बाहेर स्व. दिनकर धारणकर व शशिकला सावंत यांची तैलचित्रे लावण्यात येणार असून, त्यांचे अनावरण १४ फेबु्रवारीला सायंकाळी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. ते नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो, अफरोझ राजगुरू, साक्षी कुडतरकर, कीर्ती बोंद्रे, बाळ पुराणिक, हर्षवर्धन धारणकर, लक्ष्मण नाईक, संदीप धुरी, गुरूनाथ चिटणीस उपस्थित होते. दिनकर धारणकर यांनी नाट्यक्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची आठवण म्हणून नाट्यमहोत्सव होत असून, क्षितिज इव्हेंट आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला आहे, अशी माहिती क्षितिज इव्हेंटचे बाळ पुराणिक यांनी दिली. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, धारणकर हे सावंतवाडी सोडून मुंबई येथे गेले असते तर अनेक कलाकार त्यांनी घडवले असते. उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आजही सावंतवाडीवासीय पाहतात. त्यामुळेच त्यांच्या नावाने गेल्यावर्षीपासून नाट्यमहोत्सव भरवला जातो. यावर्षीही नाट्यमहोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे.१३ ते १५ फेबु्रवारी असे तीन दिवस नाट्यमहोत्सव चालणार असून, ‘कट्यार काळजात घुसली’ तसेच ‘एक दिवस मठाकडे’ व ‘तो खिडकी’ अशी विविध नाटके या महोत्सव ठेवली आहेत. या निमित्ताने १४ फेबु्रवारीला अभिनेते अभय खडपकर यांच्या हस्ते येथील बॅ. नाथ पै सभागृहाच्या बाहेर नाट्यकर्मी स्व. दिनकर धारणकर यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.धारणकर यांच्याबरोबरच कै. शशीकला सावंत यांचेही तैलचित्र लावण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी स्पष्ट केले. ही तैलचित्रे कायमस्वरूपी असणार असून, धारणकर यांच्या नाट्यक्षेत्रातील कामाबाबत आजही सावंतवाडीवासीयांच्या मनात आदर आहे. (प्रतिनिधी)१३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस चालणारकट्यार काळजात घुसली, एक दिवस मठाकडे अशा विविध नाटकांची मांदियाळी