शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

Sindhudurg: नौदलाच्या विविध कसरतींनी नागरिक गेले भारावून, तारकर्ली समुद्रात चित्त थरारक कसरती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:17 AM

तेजेस, मिग, आदी एअर क्राफ्टच्या आवाजाने आसमंत गेला दणाणून

संदीप बोडवे मालवण: नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौकांचा ताफा तारकर्ली समुद्रात आज अखेर दाखल झाला. मंगळवारी सायंकाळी नौदलाच्या ताफ्याने तारकर्ली समुद्रात सराव केला. या सरावाच्या वेळी आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार, आयएनएस ब्रह्मपुत्र, आयएनएस सुभद्रा आदी क्लासच्या युद्ध नौकांनी तारकर्ली समुद्रात एकागोमाग एक असे संचालन केले. तेजस, मिग, डॉर्निअर, चेतक आदी एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टरनी चित्त थरारक कसरती केल्या. यात मरीन कमांडोंसह अन्य नौदलाचे विभागही सामील झाले होते. नौदलाचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली किनारी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. या कसरती पाहून नागरिक भारावून गेले तर लडाखु विमानांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता.आकाशात भारताचा तिरंगा फडकला

सायंकाळीं पाच वाजता नौदलाचे मरीन कमांडो आकाशात पॅराशुट मधून खाली उतरत नौदलाच्या सरावाला सुरुवात झाली. निश्चित केलेल्या पॉइंट वर एका मागोमाग एक असे आकाशातू भारताच तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकवत पॅराशुट द्वारे कमांडो खाली जमिनीवर उतरले. 

यानंतर आकाशात तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्टनी आपल्या कसरती दाखविल्या. तारकर्लीच्या आकाशात लडाऊ विमानांनी कसरती चालू झाल्या नंतर त्यांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता. कमांडोनी केला विविध ड्रीलचा सराव.. समुद्रात तयार केलेली दुष्मनांची चौकी बाँबच्या साहाय्याने उध्वस्त करून मरीन कमांडोंनी आपलीं क्षमता दाखवून दिली. टार्गेट उध्वस्त केल्या नंतर या कमांडोंना नौदलाच्या हॉलिकॅप्टर मधून एअर लिफ्ट करत सुरक्षित माघारी तळावर उतरविण्यात आले. याच बरोबर युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाच्यांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आयएनएस विक्रमादित्यनेही घेतला सहभाग..

खोल समुद्रात असलेल्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौके ने सुध्दा या सरावात सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले. या युद्ध नोकेवरून काही लडाखू विमाने समुद्रातून आकाशात झेपावले होती. त्यांच्या कसरती पार पडल्या नंतर ही लडाखू विमाने विक्रमादित्यवर पुन्हा माघारी गेली. तारकर्ली समुद्रात नौदलाच्या संचलनात विनाशिका, फ्रि-गेट्स, कॉवेंट्स व क्षेपणास्त्र वाहू नौका, जलद हल्ल्याच्या युद्धनौका, सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर ध्रुव हे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टर आणि तेजस, डॉर्निअर, मिग २९ के आदी एअरक्राफ्ट आपल्या कसरती दाखविल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदल