अनंत जाधव
पूर्वी स्त्रीकडे चूल आणि मूल याच नजरेने पाहिले जात होते. पण आता स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. स्त्री आज कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या होत.
कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना साठे यांंच्यावर ई-पासची जबाबदारी होती. त्या स्वत: आठ महिने घरी गेल्या नाहीत. पण अनेकांना घरी जाण्यासाठी त्यांनी केलेली मदत ही वाखणण्याजोगी अशीच होती. त्यांना कधीही फोन केला तरी त्या नेहमीच कार्यरत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांचे काम हे ह्यऑन ड्युटी चोवीस तासह्ण असेच असल्याचे अनेकांच्या बोलण्यातून जाणवले.मूळच्या सांंगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळवा येथील असलेल्या शुभांगी साठे यांचे सासर कोल्हापूर येथे आहे. त्या फेब्रुवारी २०१९ मध्ये सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी केलेले काम हे खरोखर वाखाणण्याजोगे असेच आहे. पण खरे काम दिसून आले ते कोरोनाच्या काळात.
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले असताना मार्चपासून सर्व काही ठप्प झाले. मात्र, शासकीय यंत्रणा कार्यरत होती. त्यात साठे यांच्याकडे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे महत्त्वाचे पद असल्याने जबाबदारीही मोठी होती. अशा काळातही त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण ठरली.साठे यांंना सहा वर्षांची एक मुलगी आहे. पण कोरोनाच्या काळात तिला वेळ देता आला नाही. कोरोना काळात मन हेलावून टाकणारे प्रसंग त्यांनी अनुभवले. कोणाच्या जवळच्या माणसाचे निधन झाले होते. गरोदर महिलांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे गरजेचे होते.गंभीर आजार झालेल्यांना पासची असलेली गरज पण त्यांना प्रकिया समजत नव्हती. दिवसा तपासणी नाक्यावरून अनेकजण फोन करीत होतेच. पण मध्यरात्रीही त्यांना फोन आले तर त्या सर्वांना त्यांनी मदत केली. कोरोनाच्या काळात अनेक मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवताना साठे यांनी जी मदत केली ती त्यांच्या अश्रूतून दिसून आली.
आजची स्त्री ही चूल व मूल या दोन गोष्टींपुरती मर्यादित राहिलेली नाही हे कोरोनाच्या काळातही दिसून आले. मला कुटुंबातील सदस्यांनी तसेच कार्यालयातील सहकाऱ्यांनी दिलेली साथ ही तेवढीच महत्त्वाची आहे. आठ महिन्यांपासून घरी जाता आले नाही. शिवाय सहा वर्षांच्या मुलीलाही वेळ देता आला नाही. मात्र, तिने कधी तक्रार न करता दिलेली साथ ही खरोखरच मला प्रेरणा देणारीच आहे.-शुभांगी साठेनिवासी उपजिल्हाधिकारी(८३५५८१४०८७)