शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

नौसेना दिनाची रूपरेषा चार दिवसात स्पष्ट होणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 21, 2023 12:54 PM

मालवण : मासेमारी, पर्यटन आणि ठराविक रस्त्यांवरील वाहतुकीबाबतची अंतिम रुपरेषा येत्या चार दिवसांत जाहीर केली जाईल. त्याबाबतचा अधिकृत व्हिडीओ ...

मालवण : मासेमारी, पर्यटन आणि ठराविक रस्त्यांवरील वाहतुकीबाबतची अंतिम रुपरेषा येत्या चार दिवसांत जाहीर केली जाईल. त्याबाबतचा अधिकृत व्हिडीओ प्रशासनाकडून प्रसारित केला जाईल, त्याचप्रमाणे नौदल दिनामुळे ठराविक भागात काही निर्बंध लागू झाले, तरी नौसेना दिनामुळे भविष्यात मालवणला खूप मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती विभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी येथे दिली.नौसेना दिन कार्यक्रमाबाबत पोलिस विभागाकडून नागरिकांशी संवाद साधला जात आहे. यानिमित्ताने घनश्याम आढाव म्हणाले, नौसेना दिनाचे महत्त्व आणि अती महनीय व्यक्तीच्या आगमनामुळे सुरक्षा व्यवस्था कडक असणार आहे. साहजिकच दैनंदिन कामकाजावर काही निर्बंध येणार आहेत. तरी नौदल दिन यशस्वीतेसाठी -काही दिवस लोकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे लागेल.

राजकोटमधील नौका अन्यत्र हलविण्याचे आवाहनराजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. याठिकाणी ४ डिसेंबर रोजी अती महनीय व्यक्तींचे आगमन होणार असल्याने राजकोट समुद्रातील मासेमारी नौका तसेच येथील बंधारा कम रस्त्यावरील नौका मुख्य बंदरात किंवा अन्यत्र हलविण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून संबंधित मच्छीमारांना करण्यात आल्या आहेत.

जलपर्यटनाच्या रूपरेषेबाबत चार दिवसांत अंतिम निर्णयपोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, ३० नोव्हेंबरपासून नौदलाकडून तारकर्ली समुद्रात विविध प्रात्यक्षिके सुरू होतील. ही प्रात्यक्षिके स्थानिकांना पाहता येतील. त्यामुळे २८ नोव्हेंबरपासून नौदलाची जहाजे मालवणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सर्जेकोट ते देवबाग दरम्यानच्या समुद्रात मासेमारी आणि सागरी जलपर्यटनाची रुपरेषा कशी असेल, याविषयी येत्या चार दिवसांत अंतिम निर्णय होईल.

‘नो मेन्स झोन’मालवण ते तारकर्ली दरम्यानचा जो काही मार्ग अती महनीय व्यक्तींसाठी निवडला जाईल, व त्या रस्त्यावर ४ डिसेंबर रोजी कडक सुरक्षा व्यवस्था असेल. कदाचित तेवढ्या वेळेपुरता तो ' नो मेन्स झोन ' असेल. जेथे अती महनीय व्यक्तींची उपस्थिती असेल, त्याच्या आजूबाजूला परिसरही ह ' नो मेन्स झोन ' म्हणून त्यादिवशी घोषित केला जाईल. बहुधा या मार्गावरील बससेवा एक ते दोन दिवस बंद राहू शकते. रुग्णवाहिका सारखी अत्यावश्यक वाहतूक सुरू राहील. सोमवार, ४ डिसेंबर रोजी आठवडा बाजार बंद असेल, तर मालवण शहर आणि आजूबाजूच्या शाळांना सुटी देण्यात येईल. नौदल दिन ह यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन कोल्हे यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदल