शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कणकवलीत राष्ट्रवादीकडून तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:28 IST

NCP Kankavali Sindhudrg : गेल्या ६५ वर्षात केव्हा नव्हे तेवढी इंधन दरवाढ यावर्षी झाली आहे . त्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कणकवली तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली .

ठळक मुद्देकोविड रुग्णांचे अवाजवी घेतलेले पैसे परत करा इंधन दरवाढीबाबत आंदोलनाचा इशारा

कणकवली : केंद्र शासन दिवसेंदिवस पेट्रोल , डीझेल , घरगुती गॅसची दरवाढ करीत आहे . त्यामुळे सर्वसाधारण नागरिक त्रस्त झाले असून , त्यांचे जीवनमान हे फार हालाकीचे झाले आहे . तसेच या दरवाढीमुळे सर्वस्तरावर खर्च वाढला आहे . विविध प्रकारची वाहतुक पेट्रोल ,डीझेल, गॅसवर अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम जिवनोपयोगी वस्तूंच्या किंमती वर झाला आहे . गेल्या ६५ वर्षात केव्हा नव्हे तेवढी इंधन दरवाढ यावर्षी झाली आहे . त्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेकणकवली तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली .तसेच या इंधन दरवाढीच्या विरोधात तहसीलदार आर.जे. पवार यांना निवेदन देखील देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की , शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत . या दरवाढीमुळे सर्वसाधारण नागरिक हैराण झाले असून त्यांना जगणे मुश्कील झाले आहे . तसेच सर्वसामान्य माणूस केंद्र सरकारवर नाराज आहे . नागरिकांच्या या भावना आपल्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात . अन्यथा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनता रस्त्यावर उतरून दरवाढ कमी होईपर्यंत आंदोलन करेल. असा इशारा यावेळी देण्यात आला .यावेळी तहसीलदारांशी चर्चा करताना कोविड काळात खाजगी कोविड सेंटरकडून वारेमाप पैसे घेतले जात असल्याचा आरोप अनंत पिळणकर यांनी केला . तसेच दर नियंत्रण समितीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले . यासंदर्भात कोविड रुग्णांची बिले योग्य प्रकारे तपासणी करा व रुग्णांचे अवाजवी घेतलेले पैसे परत करा . अन्यथा दर नियंत्रण समितीच्या विरोधात राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा देखील पिळणकर यांनी दिला .या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य विनोद मर्गज , तालुकाध्यक्ष राजू पावसकर , जिल्हा चिटणीस रुपेश जाधव , युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग , कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर , दिगवळे जिल्हा परिषद मतदारसंघ विभाग अध्यक्ष अशोक पवार , मारुती पवार , चंद्रकांत नाईक , सेनापती सावंत , उत्तम तेली , किरण कदम , अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अनवर साठी , सुजल शेलार , विनोद विश्वेकर, बंड्या शेवणी , राजेश पाताडे आदी उपस्थित होते . दरम्यान, तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्यावतीने निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसKankavliकणकवलीTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग