सावंतवाडी : नॅक मूल्यांकन करून घेणे हे प्रत्येक महाविद्यालयासाठी अत्यंंत आवश्यक आहे. यामुळे महाविद्यालयाने केलेल्या शैक्षणिक, संशोधनात्मक व भौतिक सुविधांमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा व भविष्यातील प्रगतीच्या तयारीसाठी नॅक मूल्यांकनाची गरज आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी केले. सावंतवाडी येथे पंंचम खेमराज महाविद्यालयात राष्ट्रीय बँक मूल्यांकन संस्था, बंगलोर यांच्या सहकार्याने गुरुवारी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, उपकार्याध्यक्ष शुभदादेवी भोसले, संस्थेचे सचिव अॅड. सुभाष देसाई, सहसचिव सुरेश भोसले, खजिनदार अॅड. गणेश प्रभूआजगावकर, मुंबई विद्यापीठ विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधुरी पेजावर, पुणे येथील डॉ. नागनाथ धर्माधिकारी, मुलुंड वझे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. शर्मा, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले. चर्चासत्राचे समन्वयक प्रा. बी. एन. हिरामणी यांनी चर्चासत्रासंबंधी माहिती दिली. सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी नॅक मूल्यांकनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याबाबत माहिती दिली. नॅक राष्ट्रीय मूल्यांकन संस्था, बंगलोर ही उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालये व विद्यापीठाचे मूल्यांकन करणारी संस्था असून, ती त्यांच्या प्रगतीचा आढावा घेते व मार्गदर्शन करते. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, आयक्यूएसी समिती सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रगतीसाठी नॅक मूल्यांकनाची गरज
By admin | Published: February 15, 2015 9:42 PM