सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामचलावू बनली आहे. आरोग्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी गेले सहा महिने वेळ मागूनही आरोग्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत. हे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त करत आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी समिती सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. यावेळी संग्राम प्रभूगावकर, भारती चव्हाण, नम्रता हरदास, कल्पिता मुंज आदी सदस्यांसह खातेप्रमुख, अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. नामदेव मोडक, जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याच्या विविध समस्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. जनतेला चांगली सेवा देता येत नाही. विविध अत्यावश्यक मशीनरी बंद आहेत. याबाबत लक्ष वेधूनही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडून सिंधुदुर्गच्या समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जनतेला चांगली सुविधा देण्याची त्यांची मानसिकता नाही हे दिसून येत आहे. एकाही समस्येचे त्यांच्याकडून निराकरण झालेले नाही. आरोग्य समिती व जिल्ह्यातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी गेले सहा महिने पत्र व्यवहार करूनही आरोग्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नाही ही शोकांतिका आहे. जिल्ह्यासाठी वेळ न देऊ शकणारे मंत्री मिळणे हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे, अशा शब्दात आरोग्य समिती सभेत आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्यासह सर्व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)$$्रिग्रामपंचायतींना नोटीस : नाडण परिसरात कावीळ साथदेवगड तालुक्यातील नाडण येथे १९ काविळीचे रूग्ण सापडले आहेत. त्यातील १३ रूग्ण हे तेथील शाळेचे विद्यार्थी आहेत. या शाळेचे पाणी शुद्धिकरण झालेले नाही. नाडण शाळेला पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र विहीर आहे. पण तिचे शुद्धिकरण केल्याचे मुख्याध्यापकांना माहीत नाही. ही गंभीर बाब आहे. या अस्वच्छ पाण्यामुळे काविळीची साथ पसरली आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकांना व ग्रामपंचायतींना नोटीस बजाविण्याचे आदेश सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी आरोग्य समितीला दिले.
आरोग्यमंत्र्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष
By admin | Published: November 05, 2015 10:01 PM