संतोष पाटणकर खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेले व व मुंबई - गोवा महामार्गावर अतिशय महत्वाचे असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील सर्व कामकाज पाहता या आरोग्य केंद्राला नव्याने एक रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या नव निर्वाचित अध्यक्षा संजना सावंत यांनी खारेपाटण येथे सांगितले.कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला आज सकाळी अध्यक्षा संजना सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. महेश खलीपे, तालुका आरोग्य अधीकारी डॉ.संजय पोळ, कणकवली पंचायत समिती माजीं सभापती दिलीप तळेकर,पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,एकनाथ कोकाटे,इरफान मुल्ला, नाना शेट्ये,खारेपाटण ग्रा.प.उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रा.प.सदस्य महेंद्र गुरव,शमशुद्दीन काझी, उज्ज्वला चिके,किशोर माळवदे,राजू वरुनकर,सागर कांबळे आदी पदाधीकारी व अधिकारी उपस्थित होते.अध्यक्षा संजना सावंत याची निवड झाल्यानंतर खारेपाटण आरोग्य केंद्राला पहिलीच भेट असल्याने खारेपाटण केंद्राच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा ताडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सम्पूर्ण प्रथमिक आरोग्य केंद्राच्या परिसराची पाहणी तसेच रजिस्टर पाहणी अध्यक्षा संजना सावंत यांनीं केली, आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.कोविड - 19 च्या काळात येथील कर्मचारी वर्गाने चांगले काम केले असल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी दिली. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने व आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा सीमेवर व महामार्गावर असणाऱ्या खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्यविषयक लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन यावेळी संजना सावंत यांनी दिले.
खारेपाटण आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देणार : संजना सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 6:32 PM
zp Hospital Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेले व व मुंबई - गोवा महामार्गावर अतिशय महत्वाचे असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील सर्व कामकाज पाहता या आरोग्य केंद्राला नव्याने एक रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव निर्वाचित अध्यक्षा संजना सावंत यांनी खारेपाटण येथे सांगितले.
ठळक मुद्देखारेपाटण आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देणार : संजना सावंतखारेपाटण केंद्राला संजना सावंत यांनी दिली भेट