शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

नवे भात लवकरच येणार विक्रीला, नावनोंदणी प्रक्रियेला सुरुवात; यावर्षीचा दर जाहीर..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:44 PM

गतवर्षी क्विंटलला १८६८ रुपये दर देण्यात आला होता. तसेच ७०० रुपये बोनस देण्यात आला होता.

मनोज वारंगओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, खरीप हंगामात ६० हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. हळवे भात तयार झाले असून, पावसाची उघडीप पाहून शेतकऱ्यांनी भात कापणीस प्रारंभ केला आहे. लवकरच भात विक्री केंद्रावर विक्री प्रक्रिया सुरू होणार असून, तत्पूर्वी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना नावनोंदणी करावी लागणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीची मुदत देण्यात आली आहे.मार्केटिंग फेडरेशनतर्फे भात खरेदी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येते. गतवर्षी क्विंटलला १८६८ रुपये दर देण्यात आला होता. तसेच ७०० रुपये बोनस देण्यात आला होता. तर यावर्षीचा २ हजार ४० रुपये एवढा दर जाहीर झाला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पन्न सर्वाधिक शेतकरी घेत असल्याने गरजेपुरता भात ठेवून उर्वरित भात शेतकरी विकतात. त्यामुळे भात विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. भात कापणी सुरू झाल्याने डिसेंबरपासून २८ केंद्रावर भात खरेदी सुरू होणार आहेत. जे शेतकरी भात विकणार आहेत, त्यांना विक्री केंद्रावर नोंदणीचे आवाहन केले आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच भात विक्री करता येणार आहे.

भात लागवडीचा खर्च निघेना

हवामानातील बदलाचा परिणाम भात पिकाच्या उत्पादकतेवर होत असून, उत्पादकता खालावू लागली आहे. वाढती मजुरी, बियाणे, खते, इंधन दरवाढ यामुळे भात लागवडीसाठी येणारा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जास्त पावसामुळे भाताचे नुकसानपावसामुळे तयार भात जमीनदोस्त झाले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी भात कापले होते तेही भिजले आहेत. भात वाफे पाण्याने तुडुंब भरल्याने कापलेले भात पाण्यावर तरंगत होते. पाऊस असाच सुरू राहिल्यास गवत कुजण्यासह भाताला अंकुर यायला सुरुवात होवू शकते.

भातासाठी २ हजार ४० एवढा दर जाहीरगतवर्षी भाताला क्विंटलला १८६८ रुपये दर प्राप्त झाला होता. यावर्षी दरात वाढ झाली असून चालू वर्षी २ हजार ४० रुपये दराने भात खरेदी केली जाणार आहे. डिसेंबरपासून भात खरेदीला प्रारंभ होणार आहे.

दरवाढ मिळावीऋतुमानातील बदलाचा परिणाम उत्पादकतेवर होत असतानाच भात उत्पादकतेसाठी येणाऱ्या खर्चात मात्र कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे भाताला  शासनाकडून देण्यात येणारा हमीभाव वाढवून मिळावा. - वैभव परब, शेतकरी

नव्या भातासाठी थोडी वाट पहाहळवे भात कापणी सुरु झाली आहे. गरवे, निमगरवे भात तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, नोव्हेंबरपर्यंत भात कापणी पूर्ण होऊन डिसेंबर पासून भात खरेदी जिल्ह्यात सुरु होणार आहे. खरेदी केलेल्या भात भरडून तांदूळ रास्त धान्य दुकानात विक्रीसाठी पाठविला जातो.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग