शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maharashtra Vidhan Sabha 2019 : नितेश राणे भाजपामध्ये, भरला सदस्य नोंदणीचा फॉर्म 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 1:15 PM

नितेश राणे यांनी कमळ हाती घेत गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. 

ठळक मुद्देनितेश राणे भाजपामध्ये, भरला सदस्य नोंदणीचा फॉर्म कणकवली भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

कणकवली : नितेश राणे यांनी कमळ हाती घेत गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते. राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. 

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत नीतेश राणेंनी भाजपा सदस्य नोंदणीचा फॉर्म  भरला.  त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजप पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी कणकवली भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे भाजप-शिवसेना युती कडून कणकवली विधानसभा मतदार संघात उमेदवारी लढविणार असतानाच भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहत नीतेश राणेंचा भाजपा सदस्य नोंदणीचा फॉर्म गुरुवारी दुपारी भरून घेतला. नितेश राणे भाजपा कार्यालयाजवळ येताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांसह भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नीतेश राणे यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. 

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय करणार- नितेश राणे

स्वाभिमान पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजप पक्षाचे सदस्यत्व आज "मी" स्वीकारले आहे. उद्या कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय होईल, तसेच एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करू,अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. स्वाभिमान पक्षातून आलेले राणेंचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाkankavli-acकणकवली ( कंकवली )sindhudurgसिंधुदुर्ग