शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नितेश राणेंसह 19 जणांना 23पर्यंत न्यायालयीन कोठडी, उद्या जामीन अर्जावर सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 4:28 PM

आमदार नितेश राणे यांच्यासह १९ आंदोलकांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.

कणकवली : महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह १९ आंदोलकांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी कणकवलीन्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सर्व संशयित आरोपींनी जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज सादर केला असून, त्यावर बुधवार १0 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.कणकवली येथे ४ जुलै रोजी महामार्ग दुरवस्थेवरून महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आंदोलकांनी चिखलफेक करीत गडनदी पुलाला बांधून ठेवण्याचाही प्रयत्न केला होता. याबाबत तक्रार शेडेकर यांनी ४ जुलै रोजी सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार नितेश राणे यांच्यासह १८ स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक झाली होती. यामध्ये कणकवली नगराध्यक्ष समीर अनंत नलावडे(४५, कणकवली ), उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड(४५, कणकवली), संजय मधुकर कामतेकर(४६, कणकवली ), राकेश बळीराम राणे(३५, कणकवली ), अभिजित भास्कर मुसळे(४२, कणकवली ), निखिल आचरेकर(३६ ,कणकवली ), राजन श्रीधर परब(५४, कणकवली ), संदीप रमाकांत सावंत (३५, वागदे), लक्ष्मण संभाजी घाडीगांवकर ( ४२, वागदे ), संदीप चंद्रकांत मेस्त्री ( ३६, कलमठ ), सदानंद उर्फ बबन गोविंद हळदिवे(६०, फोंडाघाट), किशोर जगन्नाथ राणे(५२, कणकवली ), शिवसुंदर शाहू देसाई(२४, कणकवली), सचिन गुणाजी पारधिये(३६, कळसुली ), विठ्ठल दत्ताराम देसाई(५५, कणकवली), मिलिंद चंद्रकांत मेस्त्री(३५, कलमठ ), संदीप बाळकृष्ण नलावडे(३६, कणकवली ) यांचा समावेश होता. तर माजी नगराध्यक्षा मेघा अजय गांगण (४२, कणकवली ) यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली होती. या १९ जणांवर शासकीय कामात अडथळा, कटकारस्थान रचणे, रस्ता अडविणे यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते.५ जुलै रोजी आमदार नितेश यांच्यासह अटकेतील सर्व आंदोलकांना कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असल्यामुळे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सर्व संशयितांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.कडेकोट पोलीस बंदोबस्तकणकवली न्यायालयातून सर्व आंदोलकांची सावंतवाडी येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखून अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन काटेकोर काळजी घेत असून मंगळवारी सकाळपासूनच कणकवली न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालय परिसरात स्वाभिमानच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.पाच जणांवर होणार वैद्यकीय उपचारतसेच नितेश राणे, मेघा गांगण, संजय कामतेकर, विठ्ठल देसाई, राकेश राणे यांनी प्रकृती ठीक नसल्याने वैद्यकीय उपचार मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने ती मागणी मान्य करत सावंतवाडी येथील कारागृह प्रमुखांना संबंधितांवर वैद्यकीय उपचार करावेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार वरील पाच जणांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.जामीन अर्जावर उद्या सुनावणी१९ आरोपींची न्यायालयीन कोठडी ठोठवल्यानंतर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. कारण भा.दं. वि. ३५३ कलमानुसार दाखल गुन्ह्यात जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करावा लागतो. त्यानुसार बुधवारी जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे. या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाकडून पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतरच जामीन अर्जावर सुनावणी होऊन संबंधित आरोपींना जामिन देण्यात येणार आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे PoliceपोलिसCourtन्यायालयKankavliकणकवली