शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 5:14 PM

या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली होती.

कणकवली-  मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली होती. दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले असता, दोन्ही बाजूंनी या प्रकरणावर वकिलांनी युक्तिवाद केला, अखेर न्यायालयानं नितेश राणेंना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कणकवली बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.तत्पूर्वी नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजर केले असता, त्यांनी पोलिसांशी बोलताना गोंधळ घातला होता. तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्ही मला अटक केली तर कणकवलीकर मरतील, असे म्हणत राणेंनी पोलिसांना अटक न करण्याचे आवाहन केले. नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मला अटक केल्यास ते जिंकतील, असे म्हणत शिवसेना नेत्यांकडे इशारा केला होता.आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते आहे. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या, असे म्हणत शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या कार्यकर्त्यानी ओतल्या. कणकवलीनगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे विचारत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदीपुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे