शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

नीतेश राणे यांची आमदारकी रद्द करा

By admin | Published: January 19, 2017 11:14 PM

मेधा कुलकर्णी : अटकही करण्याची मागणी

पुणे : गडकरींचा पुतळा तोडणाऱ्या संभाजी ब्रिगेडकडून गुंडगिरी करून समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच असे चुकीचे कृत्य करणाऱ्यांना आमदार नीतेश राणेंकडून पाठिंबा मिळत असेल तर त्यांचे आमदारपद रद्द करावे तसेच त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.कोथरुड नाट्य परिषद व रमाबाई आंबेडकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी रोजी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ९७ व्या स्मृतिदिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. यामध्ये गडकरी यांच्या नाटकांतील प्रवेशांचे वाचन केले जाणार असून, हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही गुंडगिरीला घाबरते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कुलकर्णी म्हणाल्या, समाजातील कोणत्याही गटाकडून अशापद्धतीने गुंडगिरी करून स्वातंत्र्यावर गदा आणली जात असेल तर हे धोकादायक आहे. पुण्यातिथीच्या निमित्ताने घेण्यात येत असलेला कार्यक्रम राजकीय नसून सांस्कृतिक आहे. संस्थेतर्फे मागील अनेक वर्षांपासून अनेक दिग्गजांचे कार्यक्रम करण्यात येतात, मात्र आता अचानक अशा गोष्टींना विनाकारण महत्त्व देऊन राजकारण केले जात आहे. महापालिकेने ही परवानगी नाकारल्यास प्रसंगी रस्त्यावर कार्यक्रम घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. तैलचित्राबाबत म्हणणे सादर करा : न्यायालयाचे आदेशसंभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतर या ठिकाणी गडकरींचे तैलचित्र लावण्यात आले, हे कृत्य जाणीवपूर्वक आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचा आरोप अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने याबाबत महापालिका प्रशासन आणि डेक्कन पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुतळा हटविल्याच्या गुन्'ाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने पोलिसांवर दबाव येत आहे, याची न्यायालयाने दखल घ्यावी, असा अर्ज आरोपींच्या वतीने अ‍ॅड. पवार यांनी न्यायालयात केलेला आहे. त्याची सुनावणी झाली. पवार यांच्या अर्जावर सरकार पक्षाने त्यांचे म्हणणे मांडावे असा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांनी दिला आहे. या अर्जावर सरकार पक्ष, मनपा आयुक्त कार्यालय व डेक्कन पोलिसांकडून माहिती घेऊन २३ जानेवारी रोजी म्हणणे मांडणार आहे.(प्रतिनिधी)